...नाही तर तुमच्या पत्नीचे ते फोटो करेन व्हायरल... एक लाखांची मागितली खंडणी 

मनोज साखरे
Tuesday, 21 January 2020

अवनीने आपल्याकडून एक लाख रुपये घेतले; परंतु ती परत देत नाही. ती कॉलही उचलत नाही, असे सांगितले. तिच्याकडून पैसे मिळत नाहीत, तुम्ही एक लाख रुपये द्यावेत; अन्यथा तिचे अश्‍लील फोटो व्हायरल करेल, तिची व तुमची बदनामी करेल, असे धमकावत त्या व्यक्तीने फोन कट केला.

औरंगाबाद : "तुमच्या पत्नीने माझ्याकडून एक लाख रुपये घेतले; पण ती परत देत नाहीये. कॉलही रिसिव्ह करीत नाही. तुम्ही एक लाख रुपये न दिल्यास पत्नीचे अश्‍लील फोटो व्हायरल करेल,' अशी धमकी देत एका अनोळखी व्यक्तीने खंडणी मागितली.

हा प्रकार गुरुवारी (ता. 16) घडला असून, याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सक्षम (नाव बदलले आहे) हे बीड बायपास भागात राहतात. त्यांनी खंडणीप्रकरणी तक्रार दिली. त्यांची पत्नी अवनी (नाव बदलले आहे) एका शाळेत शिक्षिका आहे. गुरुवारी सक्षम हे त्यांची पत्नी आणि मित्र गप्पा मारत बसले होते.

त्यावेळी सक्षम यांना अहमद नावाने एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. अवनीने आपल्याकडून एक लाख रुपये घेतले; परंतु ती परत देत नाही. ती कॉलही उचलत नाही, असे सांगितले. तिच्याकडून पैसे मिळत नाहीत, तुम्ही एक लाख रुपये द्यावेत; अन्यथा तिचे अश्‍लील फोटो व्हायरल करेल, तिची व तुमची बदनामी करेल, असे धमकावत त्या व्यक्तीने फोन कट केला.

यानंतर सक्षम यांनी उसनवारी पैसे घेतल्याबाबत पत्नीला विचारणा केली. त्यावेळी तिने कुणाकडून एक लाख रुपये घेतलेच नाहीत, असे सांगितले. यानंतर सक्षम यांच्या मित्राने त्या कॉलरला परत कॉल केल्यानंतर त्याने परत पैशांची मागणी करून धमकावले. 

पत्नीलाही सहा महिन्यांपूर्वी फोन 
सक्षम यांची पत्नी अवनी यांनी सांगितले की, तिला सहा महिन्यांपूर्वी सादी अहमद नावाच्या व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्याने एक लाखाची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याने त्यावेळीही सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती; पण तो आपल्याशी संबंधित नसल्याने दुर्लक्ष केले होते, असे पत्नीने पतीला सांगितले. 

त्याच्यावर गुन्हा 
सक्षमने झालेल्या प्रकारानंतर रविवारी (ता. 19) उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार सादी अहमद नामक व्यक्तीविरुद्ध खंडणी मागून धमकावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली. तपास गुन्हे प्रगटीकरण शाखेचे प्रमुख कल्याण शेळके करीत आहेत. 

हेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

हेही वाचा - नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

हेही वाचा - याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

हेही वाचा - चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatening to go viral photos of wife demanded ransom of one lakh