esakal | प्रशासकाच्या एका चूकीने दिवाळीत तीन गावे अंधारात, गंगापूर तालूक्यातील घटना  
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी अंधारात.jpg

तांदुळवाडी, मांडवा व शिवपुर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गेल्या दोन महिन्यांपूर्वी कार्यकाल संपला असून या ठिकाणी शासनाने राजेंद्र आस्टोरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांना सहकारी म्हणून संजय हाके हे ग्रामसेवक आहे. प्रत्येक वर्षी सर्वांचीच दिवाळी प्रकाशमय व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतच्या वतीने सर्वजनिक खांबा वरती दिवाळीपूर्वीच विद्युत रोषणाई करून प्रकाशाच्या लखलखाटात दिवाळी साजरी केली जाते.

प्रशासकाच्या एका चूकीने दिवाळीत तीन गावे अंधारात, गंगापूर तालूक्यातील घटना  

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (औरंगाबाद) : ग्रुप ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मांडवा (ता.गंगापूर) ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मांडवा, तांदुळवाडी व शिवपुर या तीन गावातील नागरिकांना यंदा अंधारातच दिवाळी साजरी करावा लागल्याने येथील ग्रामस्थांमध्ये प्रशासक व ग्रामसेवक यांच्या विषयी  संतापाचे वातावरण निर्मा्ण झाले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

तांदुळवाडी, मांडवा व शिवपुर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या गेल्या दोन महिन्यांपूर्वी कार्यकाल संपला असून या ठिकाणी शासनाने राजेंद्र आस्टोरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांना सहकारी म्हणून संजय हाके हे ग्रामसेवक आहे. प्रत्येक वर्षी सर्वांचीच दिवाळी प्रकाशमय व्हावी या उद्देशाने ग्रामपंचायतच्या वतीने सर्वजनिक खांबा वरती दिवाळीपूर्वीच विद्युत रोषणाई करून प्रकाशाच्या लखलखाटात दिवाळी साजरी केली जाते.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

परंतु  यावर्षी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्याने व प्रशासकाची नियुक्ती झाल्याने सरपंच व सदस्य यांचे अधिकार संपुष्टात आले. खर्च कोण करणार कसे नियोजन करायचे हा प्रश्न पडला असून नियोजन कोलमडल्याने यंदा या प्रशासनाला चक्क गावातील दिवे लावण्याचा विसर पडल्याने सर्वञ काळाकुट्ट अंधार पसरला होता. अशा या अंधारात नागरिकांना दिवाळी करावी लागली. या गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 2200 इतकी असून तीनशे साठ घरे आहेत. वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन चौकशीची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. याविषयी ग्रामसेवक संजय हाके व प्रशासक राजेंद्र आस्टोरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरवर्षी आमच्या ग्रामपंचायतीकडून गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी दिवे लावण्याचे नियोजन केले जाते परंतु आमचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ग्रामपंचायत प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे नियोजन असल्याने यावर्षी आम्हाला सार्वजनिक ठिकाणी दिवे लावता आले नाही. 
विकास दुबिले (उपसरपंच)  

(संपादन-प्रताप अवचार)