
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली पर्यटनस्थळे गुरूवार (ता. १०) पासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली पर्यटनस्थळे गुरूवार (ता. १०) पासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहेत. अजिंठा, वेरूळ, दौलताबाद, बिबी का मकबरा येथे येणाऱ्या पर्यटकांना ऑनलाईन टिकीट देण्यात यावेत, यासह विविध सुचना बुधवारी (ता.९) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केल्या आहेत. पर्यटनस्थळे सुरु करण्यासाठी अनेक संघटना प्रयत्नशील होत्या. यासाठी अनेकवेळा निवेदनेही देण्यात आली. कोरोनामुळे पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे कोट्यावधीचे नुकसान झाले होते.
मात्र परवानगी मिळल्यामूळे यावर अवलंबून असलेले आनंदाने कामाला लागले आहेत. सर्व नियमाचे पालन करीत पर्यटनस्थळे खूली करण्यात येणार आहे.वेरूळ व अजिंठा लेणीस दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या मर्यादित राहील. दररोज केवळ सकाळी एक हजार तर दुपारी एक हजार अशा दोन हजार पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटनस्थळांवर प्रवेशासाठी केवळ ऑनलाईन किंवा क्युआर बेस तिकिटांची नोंदणी करता येईल. यासाठी www.mtdcresorts.in तसेच www.asi.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकिट नोंदणी करता येईल. वेरूळ अजिंठा येथे प्रवासी वाहतूक बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, असे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.
अशा आहे नियमावली
- केवळ प्रतिबंधीत क्षेत्राच्या बाहेरील पर्यटन स्थळे,स्मारके व संग्रहालये सुरु करण्यास परवानगी .
- व्यवस्थापनामधील सर्व अधिकारी,कर्मचारी, टुर ऑपरेटर, गाईड, शॉप किपर्स, पर्यटकांची ने-आण करणारे डोलीवाले यांना कोरोना चाचणी बंधनकारक.
- केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालय व जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे सक्तीचे.
- पर्यटकांना प्रवेश करतांना केवळ क्यू आर कोड टिकीट देणे ( QR-code tickets Online) देणे बंधनकारक राहील.
- वाहन पार्किंग स्थळे, उपहारगृहासह सर्व ठिकाणी फक्त डिजिटल पेमेंटला परवानगी
- फिजकल डिस्टन्स पाळावेत. मास्क नसेल तर प्रवेश नाकारावा,पर्यटन स्थळी ग्रुप फोटोग्राफीसाठी मनाई.
- कोरोनापासून बचावासाठी हात साबणाने धुणे, सर्व ठिकाणी अल्कोहोल युक्त हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा.
- पर्यटनस्थळी प्रवेशव्दारावर सॅनिटायझर, थर्मल स्क्रिनिंगची सूविधा बंधनकारक.
- पर्यटनस्थळी ध्वनी, लाईट व फिल्म प्रदर्शने पुढील आदेशापर्यत बंद राहतील. पर्यटनस्थळी खाद्यपदार्थ नेण्यास मनाई
Edited - Ganesh Pitekar