esakal | ट्रॅक्टर उलटून तीन तास वाहतूक ठप्प,ऑईल सांडल्याने वाहनांची घसराघसरी
sakal

बोलून बातमी शोधा

tractor accident

ट्रॅक्टर मधील आँईल रोडवर पडल्याने वाहतूक जवळजवळ तीन तास ठप्प झाली होती.

ट्रॅक्टर उलटून तीन तास वाहतूक ठप्प,ऑईल सांडल्याने वाहनांची घसराघसरी

sakal_logo
By
रामराव भराड

वाळुज (जि.औरंगाबाद) : वाळूज महामार्गावर टायर फुटल्याने ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ट्रॅक्टर मधील आँईल रोडवर पडल्याने वाहतूक जवळजवळ तीन तास ठप्प झाली होती. दरम्यान अग्निशमन दलाने रोडवर पडलेले ऑईल स्वच्छ केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. ही घटना रविवारी (ता.१३) रोजी दुपारी घडली.

निजाम शेख यांच्या मालकीचा ट्रॅक्टर (एम. एच. २०, सी. आर.- ३५०४) हा उसाची वाहतूक करीत होता. तळपिंप्री ते चिकलठाणा जाणाऱ्या या ट्रॅक्टरचे टायर वाळूज महामार्गावर फुटल्याने रविवारी (ता. १३) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघाताने ट्रॅक्टरमधील ऊस रोडवर पडल्याने वाहतूक ठप्प झाली.

Coronavirus: एका केंद्रावर शंभर जणांना लस; प्रशासनाची जय्यत तयारी

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रॅक्टर मधील आँईल रोडवर पडल्याने येणारी-जाणारी वाहने घसरत होती. अपघाताची माहिती मिळताच वाळुज वाहतूक शाखेचे ताहेर पटेल, एस बी सूर्यवाड, डी. दहिफळे, एस. बी.भासेवाड, रामू बीघोद यांनी अपघातस्थळी धाव घेतली.

स्क्रु ड्रायव्हरने भोसकले; प्लॉटच्या वादातून भावाचा खून

वाहतूक पोलिस घटनास्थळी येईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाळूज अग्निशमन दलास पाचारण करून रोडवर पडलेले ऑइल स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

(edited by- pramod sarawale)