संचारबंदीने अडकले बाराशे ट्रान्स्पोर्ट वाहने 

अनिल जमधडे
गुरुवार, 26 मार्च 2020

चालक-क्लीनरच्या भोजनासाठी सरसावले मदतीचे हात 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या जवळपास वाहतूक व्यावसायिकांच्या साधारण हजार ते बाराशे ट्रक उभ्या राहिल्या आहेत. या ट्रकमधील ड्रायव्हर आणि क्लीनर अडकून पडले आहेत. अडकून पडलेल्या क्लीनर-ड्रायव्हर आणि अन्य मजुरांना भोजन पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. 

संचारबंदीमुळे नागरिकांना बाहेर निघता येत नाही; तसेच विविध माल घेऊन शहरात आलेले ट्रकचालक, क्लीनर यांनाही आहे, त्याच ठिकाणी अडकून पडावे लागले आहे. यात बहुतांश परप्रांतीय चालक-क्लीनर यांचा सामावेश आहे. यातील अनेक ट्रकचालक व क्लीनर हे ढाबे, पेट्रोलपंप आणि काही विविध कंपन्यांच्या परिसरात उभे आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सतर्कता महत्वाचा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळेच केंद्र शासन आणि राज्य शासन सतर्क झाले आहे. सतर्कतेचा भाग म्हणूनच संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. देश लॉकडाऊन करण्यात आल्याने मालवाहतूकदारांना अडकून पडावे लागले आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सामाजिक संस्था मदतीला

शहरालगत अडकून पडलेल्यांना औरंगाबाद गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, ईस्कॉन, लायन्स क्लब व अन्य काही सामाजिक संघटनांनी मदतीचा हात पुढे केला आहे. चालक व क्लीनर यांना भोजन पोचवण्यात येत आहे. दूरवर अडकून पडलेल्यांना पाच किलो आटा, तेल, मीठ, मिरची, दाळ असे साहित्य पुरवण्यात येत असल्याची माहिती औरंगाबाद गुड्स ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष फय्याज खान यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport Vehicles News Aurangabad