Video: औरंगाबादेतून बाराशे परप्रांतीय मजुरांची विशेष रेल्वे भोपाळला रवाना

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने मराठवाड्यातील विविध भागात अडकून पडलेल्या मध्यप्रदेशातील १२२४ मजुरांना औरंगाबादत रेल्वेस्थानकावरुन विशेष गाडीने गुरुवारी (ता.७) रवाना करण्यात आले. लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे औद्योगिक वसाहतीत विविध कारखान्यात काम करणाऱ्या परप्रांतीय मजूर, कामगारांना अडकून पडावे लागले होते.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शासनाने विविध अटी-शर्ती आणि वैद्यकीय तपासणी सोपस्कार पार पडल्यानंतर अडकलेल्या लोकांना आपल्या गावी जाण्याची परवानगी दिली. यामध्ये औरंगाबादसह बीड, जालना, नांदेड, येथे अडकून पडलेल्या मजुरांना आपापल्या गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.

त्यानुसार या सर्व मजुरांना एसटी महामंडळाच्या बसमधून रेल्वेस्थानकापर्यंत आणण्याची सोय करण्यात आली होती. हे सर्व मजूर भोपाळ आणि परिसरातील आहेत. या सर्व मजुरांना प्रशासनाने जाण्याची परवानगी दिली, त्यानंतर रेल्वे प्रशासनाने त्यांच्यासाठी विशेष रेल्वे उपलब्ध करून दिली. गावी जाण्यासाठी म्हणून दुपारपासूनच काही मजूर नागरिकांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रशासनाची दमछाक

रेल्वेमध्ये बसवताना सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. असले तरीही त्यापूर्वी म्हणजे दुपार पासुन मजुरांचे एकत्रित घोळके रेल्वेस्थानकावर घोंगावत असताना दिसत होते. १२२४ मजुरांची यादी प्रशासनाकडे होती, असे असताना यादीत नसलेले ही अनेक मजूर रेल्वेस्थानकावर दाखल झाले होते. त्यामुळे त्यांची शहानिशा करताना प्रशासनाची दमछाक होत होती.

या पार्श्वभूमीवर पोलिस उपआयुक्त मीना मकवाना, निकेश खाटमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मजुरांसाठी सॅनीटायजर आणि मास्कचे वाटप करण्यात येत होते. मजुरांना जेवणाची पॅकेट्स आणि पाण्याची बाटलीही देण्यात येत होती. विशेष काळजी घेत मजूरांना रेल्वेत बसविण्यात आले. मजुरांची संख्या मोठी असल्यामुळे दुपारी साडेतीन वाजेपासून साडेसात वाजेपर्यंत तब्बल चार तास मजुरांना रेल्वेत बसविण्याची प्रक्रिया सुरू होती.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com