CoronaUpdate: औरंगाबादेत आज २६ रुग्ण बाधित, एकुण ७२ मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

औरंगाबादेत कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज (ता.१) सकाळी २६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५६९ झाली आहे. असे असले तरी १०२९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याशिवाय ७२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून आज (ता.१) सकाळी २६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ५६९ झाली आहे. असे असले तरी १०२९ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याशिवाय ७२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ४६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

क्लिक करा: सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

औरंगाबादेत कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असुन बळींनी सत्तरी ओलांडली. शहरात कोरोना व ईतर आजाराने आणखी तीन बळी गेले असून एकुण मृत्युसंख्या ७२ झाली. यात आतापर्यंत घाटीत ६१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर; खासगी रुग्णालयात १० व जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या)
नवी वस्ती, जुना बाजार (२), चिस्तीया कॉलनी (२), उस्मानपुरा (१), एन आठ सिडको (२), भवानी नगर (४), शिवशंकर कॉलनी (१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर  (२), आझम कॉलनी  (४), एन सहा सिडको (१), युनूस कॉलनी (१),मुकुंदवाडी (१), मिसरवाडी परिसर (१), नारेगाव (१), रेहमनिया कॉलनी (१), वैजापूर (२) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये  १३ महिला आणि १३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा: बाहेरून आले अन् रुग्ण वाढले - चिरंजीव प्रसाद

७० वा मृत्यू
औरंगाबाद शहरातील निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय महिला रुग्णाचा ३० मे रोजी सायंकाळी पाच वाजुन वीस मिनिटांनी उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला.

७१ वा मृत्यू  
किराडपुरा येथील ६२ वर्षीय महिलेला घाटीत ३० मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल आज (ता. ३१) पॉझिटीव्ह आला व त्यांचा पहाटे सव्वाबाराच्या सुमारास मृत्यू झाला. बायलॅटरल न्युमोनिया विथ एक्युट रेस्पायरेटरी डिसट्रेस सिंन्ड्रोम ड्यूटू कोवीड-१९ इन केस डायबेटीज ॲन्ड हायपरटेन्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला.

हे वाचंलत का? - आता पाच मिनिटांत कोरोनाचे निदान; राज्यातील पहिलाच प्रयोग
 
७२ वा मृत्यू  
जुना बाजार येथील ७५ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात ३० मे रोजी भरती करण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल आज (ता. ३१) पॉझिटीव्ह आला व त्यांचा दूपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. बायलॅटरल न्युमोनिया विथ एक्युट रेस्पायरेटरी डिसट्रेस सिंन्ड्रोम ड्यूटू कोवीड-१९ नोन केस ऑफ डायबेटीज मेलीटीस विथ हायपरलिपीडीमियामुळे त्यांचा मृत्यू झाला.

असा आहे कोरोना मीटर
बरे झालेले रुग्ण           - १०२९
एकूण मृत्यू                -    ७२
उपचार सुरु असलेले रुग्ण -  ४६८
एकूण रुग्णसंख्या          - १५६९

हेही वाचा:शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Six New CoronaVirus Positive Patient Found Today Aurangabad News