esakal | कोरोना लस घेतलेले दोन डॉक्टर पॉझिटिव्ह, पहिल्या डोसनंतरही धोका कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Corona Updates

कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे महापालिकेने काही कोविड सेंटर बंद केले होते.

कोरोना लस घेतलेले दोन डॉक्टर पॉझिटिव्ह, पहिल्या डोसनंतरही धोका कायम

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शहरात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर अनेकजण बिनधास्त झाले. मात्र आता पहिला डोस घेतलेल्यांपैकी दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याची समोर आले आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांची चाचणी केली असता, पॉझिटिव्ह आढळून आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर चौदा दिवस उलटल्यास शरीरात अँटिबॉडी तयार होते, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी सांगितले.

वाचा - दहावी, बारावी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांना शाळेत जाणे बंधनकारक नाही


कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस कधी येणार याची उत्सुकता नागरिकांना लागली होती. त्यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला लसीला मान्यता मिळाली व १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्गात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना डोस देण्यात आला. लसीचे दोन डोस घ्यावे लागणार आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला जात आहे.

वाचा -  औरंगाबादकरांनो काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, १३७ जण कोरोनाबाधित

शहरात सध्या दुसरा डोस देण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. असे असतानाच पहिला डोस घेतलेल्यांपैकी दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात डॉ.पाडळकर यांनी सांगितले की, या डॉक्टरांमध्ये कोरोनाची सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळली आहेत. म्हणजेच त्यांना पहिल्या डोसनेही काही प्रमाणात प्रोटेक्शन मिळत आहेत. मात्र संपूर्ण प्रोटेक्शन दुसरा डोस घेतल्यावर १४ दिवसांच्या नंतरच मिळू शकते. त्यामुळे लस घेऊनही कोरोना झाला किंवा लस लागू पडली नाही, असे म्हणणे चुकीचे होईल.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बंद कोविड सेंटर सुरू करणार
कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे महापालिकेने काही कोविड सेंटर बंद केले होते. सध्या शहरात मेल्ट्रॉन, पद्मपुरा सेंटर्सच सुरू आहेत. लवकरच एमजीएम आणि किलेअर्क येथील कोवीड सेंटर्सही सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ.पाडळकर यांनी सांगितले.
 

संपादन - गणेश पिटेकर