वाळूज : कारमध्ये होते महिला अन् पुरुष, समोरून आला मृत्यू

Two killed in Accident At Waluj
Two killed in Accident At Waluj

वाळूज (जि. औरंगाबाद) ः भरधाव कंटेनर व कारच्या झालेल्या अपघातात कारमधील एक महिला व पुरुष असे दोघे ठार झाले. हा अपघात मंगळवारी (ता. ९) रात्री आठच्या सुमारास मुंबई-नागपूर एक्स्प्रेस वेवरील साजापूर ते तनवाणी स्कूलदरम्यान झाला. 

पंढरपूर येथील दुकानदार विठ्ठल बापूराव गोडसे (वय ४०, रा. साईनगर, सिडको महानगर) हे मंगळवारी (ता. ९) कारने (एमएच- २०, सीपी- ३०४०) अरुणा साहेबराव हातोळे (४२) हे दोघे मुंबई-नागपूर एक्सप्रेस वेवरून जात असताना एएस क्लबकडून लासूरकडे जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाने कारला जोराची धडक दिली. यात कारचा चेंदामेंदा होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे आर. डी. वडगावकर व सोनाजी बुट्टे यांनी अपघातस्थळी धाव घेत अन्य प्रवाशांच्या मदतीने कारमधून बाहेर काढले. दरम्यान, जखमींना ‘घाटी’त दाखल केले. यात दोघांचाही मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिसात नोंद नसल्याचे सांगण्यात आले. 

रुग्णवाहिका चालकाला केली धक्काबुक्की 
या अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेच्या चालकाने अपघातस्थळी धाव घेतली; मात्र रुग्णवाहिकेत डॉक्टर नसल्याने तेथील काही संतप्त लोकांनी चालकाला धक्काबुक्की केली.  

देवगाव फाटा येथे अपघातात दुचाकीस्वार ठार  

आडूळ ः रस्ता ओलांडत असताना भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (ता. नऊ) दुपारी साडेचारच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा (ता. पैठण) येथे घडली. राम बाजीराव यदमळ (वय ३६, रा. रजापूर ता. पैठण) असे मृताचे नाव आहे. 

यदमळ हे दुचाकीने (एमएच-२०, ईपी-९३७७) देवगाव गावातून येणाऱ्या रस्त्याने महामार्गाला लागल्यावर दुचाकी थापटीतांडा गावाकडे जाण्यासाठी वळवीत होते. पाचोडकडून आडूळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कारची (केए-३५, एन-७३१६) त्यांना धडक बसली. या अपघातात यदमळ यांची दुचाकी जवळपास तीस ते चाळीस फुटांपर्यंत फरफटत गेलेली. यात दुचाकीचा चुराडा होऊन यदमळ जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे, बिट जमादार कल्याण राठोड, फेरोज बरडे, सुधाकर काकडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. यदमळ यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई असा परिवार आहे. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com