पित्यानं ठेवलं मुलाचं नाव 'राष्ट्रपती'; " बेटा बडा नाम करेगा ... पित्याची अपेक्षा!

अविनाश काळे
Saturday, 16 January 2021

ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा (पाळणा) सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे

उमरगा (उस्मानाबाद): अलीकडच्या काळात स्त्री जन्माच्या स्वागताची प्रथा रूढ झाली आहे. वंशाचा दिवा म्हणून मुलाच्या जन्माचेही मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण आगळ्या - वेगळ्या स्वरुपाचे असते. तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे नाव चक्क "राष्ट्रपती" ठेवल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा (पाळणा) सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. पारंपारिक पद्धतीने महिला बाळाच्या कानात फुंकर मारुन नाव ठेवले जाते. देव - देवतांचे नाव ठेवण्याची प्रथा अजुनही आहे. अलीकडच्या काळात मात्र राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचे नाव बाळाला देण्यात येत आहे. पणजोबा, आजोबा, आजीचे नाव वाढवण्यासाठी प्रथाही अजुन आहे.

जरंडीत दगडफेक; कुटुंबियांना मारहाण

दरम्यान तालुक्यातील चिंचोली (जहागीर) येथील बी. कॉम., डी.एड. झालेले दत्ता चौधरी सुशिक्षित बेकार आहेत, संघटनेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र हा मार्ग कुंटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसा नसल्याने गावातच शिकवणी वर्ग सुरू केले, श्री. चौधरी यांच्या कुटुंबात १९ जून २०२० रोजी पुत्ररत्न आला. पुत्ररत्नाचा उत्साह कुटुंबात होता, त्याच्या नामकरणाची वेळ आली.

बोगस व्यापाऱ्यांवर धडक कारवाई; राज्यकर जीएसटी विभागाची कारवाई

महिलांनी पहिल्यांदा देव - देवताच्या नावाची फुंकर मारली. श्री. चौधरी यांनी मात्र कल्पकतेने मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्याचा निर्णय घेतला. जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर महानगरपालिकेतून राष्ट्रपती दत्ता चौधरी या नावाने जन्मप्रमाणपत्र घेतले. त्यानंतर नुकतेच या नावाचे आधारकार्डही काढून घेतले आहे. दरम्यान राष्ट्रपती हे सर्वोच्च घटनात्मक पद आहे, त्याचा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. या पदाबाबत मोठी आस्था असल्याने कुटुंबातही राष्ट्रपती असावा अशी भोळी संकल्पना असावी म्हणूनच मुलाचे नामकरण राष्ट्रपती केले असावे.

आता राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदाचेही नामकरण झाले तर आश्वर्य वाटू नये. सर्वोच्च पदाचे नामकरण झाले म्हणजे त्याची गुणसंपन्नता प्रत्येकाच्या अंगी येईलच असे नसते मात्र नावाच्या प्रतिमेतुन त्या बालकाला प्रोत्साहन मिळावे असे पालकांना अपेक्षित असते पण त्यासाठी त्या बालकांचे स्वतःचे कर्तृत्व महत्वाचे असते.

" देशात, राज्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे, पदवी घेऊनही नौकऱ्या मिळत नाहीत, मीही पदवीधर व पदविकाधारक असुन बेकार आहे. मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवण्यामागचा हेतू प्रेरणा मिळण्याचा आहे, त्यातून भविष्यात मुलाला विविध क्षेत्राचे ज्ञान मिळावे,  खडतर प्रयत्नातुन यशाचे शिखर गाठण्याची संधी मिळावी, शिवाय राष्ट्रभिमान असावा. यासाठी मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवले. - दत्ता चौधरी, पालक

(edited by- pramod sarawale) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: umarga news father give rashtrapati name to child usmanabad