उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म : वरद गणेश मंदिरातर्फे रोज 3 हजार जणांना भोजन

दुर्गादास रणनवरे
Saturday, 18 April 2020

आपल्या राज्यातील मजूर, कामगार तसेच परराज्यातील नागरिक जे की औरंगाबाद शहरात अडकले आहेत अश्यांची गैरसोय होउनये यासाठी संस्थांतर्फे या सर्वांसाठी दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

औरंगाबाद : 'उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' या उक्तीप्रमाणेच समर्थनगर येथील वरद गणेश मंदिर संस्थानतर्फे शहरातील विविध भागांत लॉककडाऊनमुळे अडकलेल्या तब्बल 3 हजारांवर मजूर, कामगार, तसेच परराज्यातील नागरिकांना दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थानतर्फे हा अखंड अन्नदानाचा महायज्ञ 3 मे पर्यंत सुरूच राहणार आहे.

अन्नदानाच्या या उपक्रमाबद्दल अधिक माहिती देताना वरद गणेश मंदिराचे सचिव मनोज पाडळकर यांनी "सकाळ"शी बोलतांना सांगितले, की कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात सर्वत्र लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील मजूर, कामगार तसेच परराज्यातील नागरिक जे की औरंगाबाद शहरात अडकले आहेत अश्यांची गैरसोय होउनये यासाठी संस्थांतर्फे या सर्वांसाठी दोन्ही वेळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

शहरातील विविध भागात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना जागेवर भोजन पुरविले जात असल्याचेही पाडळकर यांनी स्पष्ट केले. यामध्ये प्रामुख्याने पोलीस मुख्यालयातील स्वच्छता कामगार, जटवाडा येथील वीटभट्टीवर काम करणारे कामगार, तसेच रोजंदारीवरील कामगार, चेतनानगर झोपडपट्टी तसेच सातारा परिसर, एमजीएम कॉलेज परिसरातील बांधकाम कामगार, सुंदरवाडी झाल्टा परिसरातील झोपडपट्टी, बीड बायपास परिसरातील परप्रांतीय मजूर, कामगार तसेच शहरतील विविध भागात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना दररोज जागेवर भोजनाची व्यवस्था केली जात असल्याचा दावा श्री.पाडळकर यांनी केला आहे. 

औरंगाबादेतील कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

या उपक्रमाची पाहणी नुकतीच धर्मादाय सह आयुक्त सुरेंद्र बियाणी यांनी केली. संस्थेतर्फे सुरू असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासोबत धर्मादाय कार्यालयातील निरीक्षक अजित पाटील, तसेच श्रीराम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त दयाराम बसैय्ये उपस्थित होते. सर्वांनी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्रशंसा केली व पाडळकर यांना शुभेच्छा दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Varad Ganesh Temple Provides Food In Corona Lockdown Aurangabad News