देव लागला द्यायला पण पदर नाही घ्यायला!  शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस विरोध

सुषेन जाधव
Friday, 24 April 2020

‘देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी म्हण ग्रामीण भागात चांगलीच प्रचलित आहे. मात्र याचा प्रत्यय प्रत्यक्ष शेतकऱ्याला आल्याने ‘आता काय’ असा प्रश्‍न उभा राहिल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

औरंगाबाद : ‘देव लागला द्यायला अन् पदर नाही घ्यायला’ अशी म्हण ग्रामीण भागात चांगलीच प्रचलित आहे. मात्र याचा प्रत्यय प्रत्यक्ष शेतकऱ्याला आल्याने ‘आता काय’ असा प्रश्‍न उभा राहिल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

त्याचे झाले असे की, लॉकडाऊनच्या काळात खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांचे गट कृषी विभागाच्या पुढाकाराने फळे, भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी येत आहेत, यातून ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळतोय तर मध्यस्थ नसल्याने शेतकऱ्यांनी परवडते. इतकेच नव्हे तर २९ मार्चपासून सुरु केलेल्या या उपक्रमातून शेतकऱ्यांनी सर्वाधिक म्हणजे सात लाख रुपयांचा भाजीपाला अवघ्या सहा तासात विक्री केला आहे. असे असले तरी लॉकडाऊनच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे काही गावातील शेतकऱ्यांना गावाबाहेर भाजीपाला घेऊन शहरात जाण्यास गावकऱ्यांनी मज्जाव केल्याने शेतकऱ्यांसमोर पेच पडला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

कृषी विभागाच्या पुढाकाराने लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २९ मार्चपासून शेतकरी ते ग्राहक थेट भाजीपाला योजनेद्वारे शहरात भाजीपाला विक्री करण्यात येत आहे. आजवर तालुक्यातील शेतकरी गटांनी ९३ लाख २० हजार ५६० रुपयांचा फळे, भाजीपाला विक्री केला आहे. आजवरच्या दैनंदिन विक्रीपेक्षा गुरुवारी (ता.२३) सर्वात जास्त म्हणजेच ७ लाख ३ हजार १२० रुपयांचा भाजीपाला, फळे विक्री केली आहेत. असे असतानाही तालुक्यातील काही गावचे ग्रामस्थ शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे घेऊन औरंगाबाद शहरात विक्रीसाठी येऊ देत नाहीत असे चित्र आहे. 

काहीही करा पण माल जाऊ द्या 
एकीकडे कोरोनामुळे आम्ही जीव धोक्यात घालून शहरात भाजीपाला विक्री करतो. त्यासाठी गावाची आजवर कोणतीही समस्या नव्हती, मात्र आता ग्रामस्थांनी गावातून बाहेरगावी जाण्यासाठी मज्जाव केल्याने गावातून भाजीपाला शहरात विक्रीसाठी आणता येणार नाही. असे जर चालत राहिले तर डोळ्यादेखत शेतमालाची नासाडी झालेली पाहवली जाणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावर कृषी विभाग, जाणकारांनी मार्ग काढावा, अशी सादही शेतकऱ्यांनी घातली आहे. यावर तात्पूरता तोडगा म्हणून शहरातील विश्‍वास पालीमकर यांनी शेतकऱ्यांचा शेतमाल औरंगाबादला घेऊ येऊ असा विश्‍वास शेतकऱ्यांना दिला आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers Oppose Farmers For Vegetable Selling In City Aurangbad News