esakal | वीरशैव तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शांतीतिर्थ स्वामी यांचे निधन, आज चाकूरमध्ये अंत्यसंस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Shantitirth Swam

वीरशैव तत्त्वज्ञान व संत साहित्याचे अभ्यासक शांतीतिर्थ संगय्या स्वामी चाकूरकर (वय ७७) यांचे शनिवारी (ता. १२) पहाटे औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (ता. १२) सकाळी चाकूर (जि. लातूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वीरशैव तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शांतीतिर्थ स्वामी यांचे निधन, आज चाकूरमध्ये अंत्यसंस्कार

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : वीरशैव तत्त्वज्ञान व संत साहित्याचे अभ्यासक शांतीतिर्थ संगय्या स्वामी चाकूरकर (वय ७७) यांचे शनिवारी (ता. १२) पहाटे औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (ता. १२) सकाळी चाकूर (जि. लातूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते वीरशैव साहित्याचे गाढे अभ्यासक आणि अखिल भारतीय वीरशैव साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष होते.विरशैव तत्त्वज्ञान, नागेश संप्रदायासह विविध संत साहित्यावर त्यांनी संशोधन केले. हस्तलिखित, जुना दस्तऐवज साहित्याचा त्यांच्याकडे संग्रह होता. नगर येथील ऐतिहासिक संशोधन मंडळातून त्यांनी शिवागमाधारीत वाडःमय त्यांनी मिळविले.

मोठी खुर्ची हटवून मुख्यमंत्री ठाकरे बसले साध्या खुर्चीवर, आपणही सामान्य असल्याचा दिला संदेश

विरशैव संत कवी मन्मथस्वामी यांचे परमरहस्य ग्रंथाची त्यांनी हस्तलिखीते मिळवली. तसेच गूरूगिता या टिकाग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला. ‘सत्यात्मज’ यांच्या साहित्यावरही त्यांनी संशोधन केले आहे. हस्तलिखिते, पोथ्या, पुस्तिका, ओव्या, अभंग, आरत्या, पदं तसेच भारुडांचा मोठा संग्रह केला. कपिलधार मासिकाचे संपादक तसेच साखरखेर्डा मठसंस्थानच्या पदसिद्ध दर्शन मासिकाच्‍या संपादकीय सल्लागार मंडळातही ते होते. १९७० ते ८० दरम्यान अडगळीत असलेले वीरशैव साहित्य त्यांनी प्रकाशात आणले व ते मासिकाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोचवले. त्यांना वीरशैव साहित्यातील महत्त्वाचा डॉ. चंद्रशेखर कपाळे (काशीपीठ) पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. बर्दापूर (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील रेणुका विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून ते प्रसिद्ध होते.

आयुष्यभर केले संशोधन
संशोधनासाठी त्यांनी महाराष्ट्रभर पायपीट केली. स्वखर्चातून त्यांनी अनेक संत साहित्याची हस्तलिखिते मिळवून अभ्यास केला. आगामी त्यांचे शिवलिंगाची कविता हे संतकवी मन्मथस्वामी यांच्या वडीलांचे साहित्य प्रकाशित होणार आहे. त्यांच्या संग्रहातील संदर्भग्रंथ व हस्तलिखितांचा अनेक संशोधकांना अभ्यासासाठी उपयोगात आले.


संशोधन केवळ घरी बसून करण्याचा विषय होऊ पाहत आहे. पण शांतीतिर्थ स्वामी यांनी स्वतः महाराष्ट्र व इतर ठिकाणी जाऊन संत साहित्याबाबतचे संदर्भ, हस्तलिखीते मिळविली, संतांचे साहित्य त्यांनी प्रकाशझोतात आणले. अभ्यासकांना प्रेरणा देण्याचे त्यांनी कार्य अविरत केले.
- पं. शिवाप्पा खके, शिवागमाचे अभ्यासक