यूपी से ज्यादा हम महाराष्ट्रमेंही सुरक्षित थे!

पासवान कुटुंब
पासवान कुटुंब
Updated on

औरंगाबाद - जब हम आजमगढ (उत्तर प्रदेश) के लिए रवाना हुए, तब महाराष्ट्र के पुलिसने हमे खाने-पीनेका तीन-चार दिन का सामान दिया था. दुसरे दिन जब हम लोग आग्रा पहुंचे तो, हमे पीने के लिए पानी चाहिए था, लेकिन वहॉं ना ही पुलिस और ना ही वहाँ के लोग, दोनोंने हम पर ध्यानही नहीं दिया. सर, महाराष्ट्र के लोग और पुलिस सब अच्छे हैं... औरंगाबादहून आजमगडकडे रवाना झालेल्या शेंद्रा येथील पासवान कुटुंबाने ही आपबिती सांगितली. 

शिक्षकांनी केली मदत 
शेंद्रा एमआयडीसी येथे उत्तर प्रदेशातील पासवान कुटुंब तीन वर्षांपासून राहत होते; परंतु लॉकडाउनमुळे सर्व कामधंदे बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत होती. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पासवान कुटुंबाचे आजमगडला जाण्यासाठी प्रयत्न सुरू होते. आई-वडील जेमतेम शिकलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलांना शेंद्रा येथील जि. प. प्रा. शाळेत घातले होते. त्यांची मोठी मुलगी रिया पासवान (इयत्ता सहावी) हिला शुद्ध मराठी बोलता आणि लिहिताही येते. त्यामुळे दररोज ती मुलगी आई-वडिलांना पेपर वाचून तसेच मोबाईलच्या माध्यमातून माहिती देत होती. परराज्यांत जाणाऱ्या लोकांसाठी शासनाकडून रेल्वे, ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आल्याचे समजल्यावर रियाने आपले शिक्षक संजीव देवरे यांना संपर्क साधून पास काढण्याची विनंती केली. संजीव देवरे यांनीही तातडीने मेडिकल सर्टिफिकेट, आधार कार्ड अशी कागदपत्रे गोळा करून ग्रामपंचायत, सरपंचांकडून पास तयार करून घेतला. 

...अन् ट्रेन आली 
अखेर जाण्याची तारीख आली. रियाचे आई-वडील, लहान भावंडे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत उभे होते. त्यावेळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पासवान कुटुंबाने चार दिवसांच्या प्रवासासाठी घेतलेल्या भाकरी भिजून त्यांचा चिखल झाला. त्यातच ट्रेन रद्द झाली असल्याची अफवा पसरली. त्यामुळे सर्वजण हताश झाले. पासवान कुटुंबाला पुढे काय करावे, हे सुचत नव्हते. तेव्हा अचानक पोलिसांनी आवाज देत सांगितले, की आग्रा येथे जाणारी ट्रेन येत आहे आणि रियाच्या कुटुंबाचा जीव भांड्यात पडला. पण प्रश्‍न होता, तो प्रवासात खायचे काय? यावेळी महाराष्ट्र पोलिस सर्व परप्रांतीयांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी प्रत्येकाला जेवणाचे डबे, मुलांना बिस्किटांचे पुडे, पाण्याच्या बाटल्या दिल्या. त्यांची ही मदत पाहून सर्वच परप्रांतीयांचे डोळे महाराष्ट्राचा निरोप घेताना पाणावले होते. 

घरवालोंने बाहरही रखा! 
तीन दिवसांनंतर रियाने शिक्षक देवरे यांना फोन करून सुखरूप पोचल्याचे सांगितले. यावेळी रियाच्या आईने महाराष्ट्रातील पोलिस आणि नागरिकांचे आभार मानले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ‘‘सर, महाराष्ट्र की पुलिस और लोग बहुत अच्छे है. हम आग्रा पहुंचे तो हमारे पास पानी, खाना कुछ भी नही था. बच्चोंको भूक लगी थी. हमे ऐसा लगा की, आग्रा के लोग और पुलिस हमे मदद करेगी, लेकिन उन्होने हमपर ध्यानही नहीं दिया. उसके बाद हम आजमगढ पहुंचे. वहाँ भी हमारे घरावालोंने हमें घरपर नहीं आने दिया... गाँव के बाहरही रखा है. कोई भी हमपर ध्यान नहीं दे रहा है. हमको तो लगता है, हम महाराष्ट्रमेंही सुरक्षित थे...!’’ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com