Corona News Aurangabad
Corona News Aurangabad

वीस मेनंतर लॉकडाऊनमधून मिळू शकतो दिलासा

Published on

औरंगाबाद : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजाराच्यापुढे गेल्यामुळे २० मेपर्यंत लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या काळात आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहणार असून, केवळ घरपोच भाजीपाला, फळे, दूध विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून भाजीपाला व दुधाचा पुरवठा बंद आहे. जिथे दूध मिळते तिथे रांगा लागत आहेत. म्हणून २० तारखेनंतर कोरोनाबाबत परिस्थिती सुधारली तर शहरवासीयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुन्हा सम-विषम पद्धतीने किराणा दुकाने उघडू शकतात, असे सूत्रांनी सांगितले. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या संपर्काची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १४) रात्री उशिरा घेण्यात आला. आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर सर्व पास व सम-विषमचा निर्णय रद्द करण्यात आला. सुरवातीस रविवारपर्यंत (ता.१७) हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवारपासून आरोग्यविषयक अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद आहेत.

रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी  जागोजागी पोलिसांचे चेकपॉइंट लावण्यात आले आहेत. रविवारी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपला व राज्य शासनाने ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरात देखील २० मेपर्यंत नागरिकांना कुठलीही सूट न देण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिकुमार पांडेय यांनी रविवारी रात्री सुधारित आदेश काढले आहेत. त्यात २० मेपर्यंत शहरात केवळ घरपोच भाजीपाला, दुधाचा पुरवठा करण्यास परवानगी असेल.

मात्र संबंधित व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाकडून परवागनी घ्यावी लागणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी घरपोच भाजीपाला व दुधाचाही पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून २० मेनंतर शहरात पुन्हा सम-विषम पद्धत राबविली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

खबरदार पाचपेक्षा जास्त जण एकत्र याल तर... 
कोरोनाच्या रेड झोनमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना पोलिस परवानगीशिवाय एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच स्वस्त धान्य दुकाने देखील बंद ठेवण्यात आली आहेत. घरपोच साहित्य पुरवठा करणाऱ्यांना मात्र मुभा राहणार आहे. 

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

आदेशातील ठळक बाबी 
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची वाहनांची वाहतूक बंद राहील.
अत्यावश्यक सेवेतही चारचाकी वाहनात चालक सोडून दोघांना परवानगी.
महापालिका क्षेत्रातील सर्व मॉल्स, व्यापारी संकुले, बाजारपेठा बंदच.
औषधी, वैद्यकीय उपचाराची उपकरणे देणाऱ्या सेवांची दुकाने सुरू राहतील.
सरकारी कार्यालयात ३३ टक्के कर्मचारी उपस्थितीला परवानगी.
सुधारित शासन आदेशानुसार अडकलेले मजुर, प्रवाशांना येण्या-जाण्यास मंजुरी.
तात्पुरते बैठे भाजीपाला, फळ विक्रीची दुकानेही सुरू करण्यास मनाई.
घरपोच भाजीपाला, फळे, दुधाचा पुरवठा करण्यास शेतकऱ्यांना परवानगी.
सर्व प्रकारची मालवाहतूक, रिकामी जडवाहने, ट्रक यांना वाहतुकीस परवानगी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com