
वन्यजीवांचे होणार संरक्षण, लवकरच होणार कार्यान्वित
औरंगाबाद : शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक दौलताबाद गावात आता एका नावीन्यपूर्ण हॉस्पिटलची भर पडणार आहे. हे हॉस्पिटल नावीन्यपूर्ण यासाठी ठरणार आहे की, या ठिकाणी माणसांवर नाही तर वन्यप्राण्यांवर उपचार केले जाणार आहे. दौलताबाद गावाजवळच असलेल्या वन विभागाच्या रोपवाटिकेत वन्यजीवांवर उपचार आणि संवर्धनासाठी काम चालणार आहे. यालाच वाईल्ड लाईफ रेस्क्यू सेंटर म्हणून देखील ओळखले जाणार आहे. तीस लाखांच्या निधीतून या हॉस्पिटलचे काम चालू असून येत्या महिन्याभरात कार्यान्वित होईल.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
औरंगाबाद म्हटले की ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा. ऐतिहासिक वास्तूबरोबरच जिल्ह्यात वनसंपदेचे देखील मोठे जाळे आहे. गौताळा, सारोळा, म्हैसमाळ सारखे अभयारण्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, वन्यक्षेत्रात मानवी हस्तक्षेप वाढल्याने वन्यप्राणी नागरी वसाहतीत शिरकाव करतात. याचीच प्रचिती व थरारक अनुभव औरंगाबादकरांनी अनुभवला तो ३ डिसेंबर २०१९ रोजी. सिडको एन-१ परिसरात बिबट्या शिरला होता. श्वास रोखून घटणाऱ्या या घटनेमुळे वनविभागाचा भोंगळ कारभार समोर आला. जवळपास दहा तास चाललेले वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन शेकडो लोकांनी पाहिले. या घटनेनंतर वनविभागाने स्वतः:चे वाईल्ड लाईफ ट्रीटमेंट सेंटर उभारण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दिला. महसूल प्रशासनाने वनविभागाच्या या प्रस्तावाला देखील मान्यता दिली. त्यात तीस लाखांचा निधी मंजूर केला.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
तीस लाखांचा निधी मिळाला
वनविभागाकडे स्वतः:च्या मालकीचे व हक्काचे उपचाराकेंद्र नव्हते. त्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. या सेंटरमुळे आता वनविभागासह वन्यजीव विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वन्यजिवांच्या उपचारासाठी ३० लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाने वर्ग केलेला आहे. यातून रेस्क्यू सेंटरसाठी लागणारी साहित्य खरेदी जवळपास पूर्ण होत आली आहे.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या साहित्याची खरेदी
वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी ऑपरेशन टेबल, उपचार साहित्य, ट्रॅप बास्केट, पिंजरे, अद्ययावत रेस्क्यू व्हॅन, दोरी, काठ्या, ग्लोव्हज, रेस्क्यू ऑपरेशन कीट, ट्रॅंक्यूलायझर गन आदी साहित्य खरेदी केले जात आहे. तर दौलताबादेतील रोपवाटिकेत मोठी इमारत नाही. परंतु सध्या ज्या रुम बांधण्यात आलेल्या आहेत त्या पुरेशा असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
दोन जिल्ह्याला होईल फायदा
दौलताबाद हे औरंगाबाद शहरापासून अगदी पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यातच औरंगाबादला लागूनच असलेल्या जालना. या दोन्ही जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. औरंगाबाद विभागातंर्गत जालना व औरंगाबाद अशा दोन्ही जिल्ह्याचा समावेश होतो.