esakal | विद्यार्थी अपघात अनुदान मिळणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार 43 विद्यार्थ्यांचा मृत्यू हा पाण्यात बडून झाला आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे. या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा

विद्यार्थी अपघात अनुदान मिळणार का?

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेअंतर्गत जिल्ह्यामधून 2018 व 2019 या दोन्ही वर्षात सुमारे 60 प्रस्ताव जिल्हा परिषदेत दाखल झाले आहे. त्यापैकी साधारण 55 विद्यार्थ्यांना अपघाती मृत्यू झाला.

मृत्यू झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या कुटुंबाला राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 75 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. 2018 यावर्षी 28 तर 2019 मध्ये 20 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. शिक्षण विभागाला प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार 43 विद्यार्थ्यांचा मृत्यू हा पाण्यात बडून झाला आहे.

 यात पाणी भरताना विहिरीत पडणे, नदी, नाले, तलावात पोहताना बुडणे अशी कारणे आहेत. 10 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दोन विद्यार्थ्याचा मृत्यू सर्पदंशामुळे झाला आहे. शहर अथवा जिल्ह्यातील अनेक शाळा या नदी, ओढा, कालव्याच्या तीरावर आहेत. त्याचबरोबर अनेक शाळा मुख्य रस्त्यालगतही आहेत. अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांना कुंपण नसल्याने अशा घटना घडतात. 

अरे बाप रे -  औरंगाबादेत आठ जणांचे कुत्र्यांनी तोडले लचके 

बाल शिक्षण हक्क योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेला कुंपण असणे आवश्‍यक आहे; मात्र शासनाच्या या निकषाकडे जिल्हा परिषद व खासगी शाळांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. जिल्हा परीषदेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार, 68 पैकी 53 विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर अपंगत्व आलेल्या तीन विद्यार्थ्याला 30 हजार रुपये याप्रमाणे 12 लाख 30 हजार रुपये मिळावेत म्हणून शिक्षण विभागाने हा प्रस्ताव मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीकडे सादर केला आहे. तर दोन प्रस्ताव नामंजूर केले आहेत.

गूग न्यूज -  घाटीतील तीन इमारतींच्या वीज जोडणीचा मार्ग मोकळा 

 प्राप्त झालेले प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केले असून, तेथून मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित रक्कम पालकांकडे सुपूर्द केली जाणार असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. मात्र, अद्याप बहुतांश विद्यार्थी कुटूंबाला योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

अनुदानास विलंब 
राज्यात गेल्या सात महिन्यांचा कालावधी लोकसभा व विधानसभा निवडणूक व आचारसंहितेत गेला. त्यानंतर सत्तास्थापनेला बराच कालावधी गेला आहे. अद्याप मंत्रिमंडळाचे खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे. या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा शिक्षण विभागातील अधिकारी व्यक्त करीत आहेत. 

राजीवगांधी विद्यार्थी अपघात अनुदान योजना निधी 

  • - विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास ः 75 हजार रुपये 
  • - एक अवयव निकामी झाल्यास ः 30 हजार रुपये 
  • - दोन्ही अवयव निकामी झाल्यास ः 50 हजार रुपये