esakal | हिवाळा आला, मासे आणा! औरंगाबादेत रोज पाच क्विंटल मासळी हवी 
sakal

बोलून बातमी शोधा

fish.jpg

गोड्या पाण्यातील मासळीसह सी फूडला मागणी 

हिवाळा आला, मासे आणा! औरंगाबादेत रोज पाच क्विंटल मासळी हवी 

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : थंडी सुरू झाली की मासे खाणाऱ्यांची संख्या वाढत असते. सध्या दररोज शहरात मासे खाणारे शौकीन पाच क्विंटल मासे खातात. यंदा चांगला पाऊस झाल्याने नदी, तलाव आणि धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने मासळीची उपलब्धताही मुबलक आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
यावर्षीच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी झाली. पर्यायाने नदी, तलाव, धरण, शेततळ्यातला पाणीसाठा वाढला असल्याने मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. गोड्या पाण्यातील मासे स्वादिष्ट असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरात लहानमोठे शंभरावर मासे विक्रीची दुकाने आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गोदावरी फिशचे बशीर कुरेशी म्हणाले, हिवाळ्यात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असते; मात्र आता काही डॉक्टर्स रुग्णांना मासे खाण्याचा सल्ला देत आहेत, त्यामुळे बाराही महिने मासे खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गोड्या पाण्यातल्या माशांना चांगली मागणी आहे. रोज पैठण व इतर ठिकाणांहून शहरात मासे विक्रीसाठी येतात, शहरातील सर्व दुकानांमधून दररोज सुमारे पाच क्विंटल मासे विकले जातात. याशिवाय मुंबइहून येणाऱ्या सी फूडलाही चांगली मागणी आहे. खेकडे, ताजी कोळंबी, बोंबील, बांगडा, पापलेट या सी फूडला खवय्यांची अधिक पसंती असल्याचे ते म्हणाले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)