esakal | वाळूजच्या वडगाव कोल्हाटीत विवाहितेची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suscide

एका अठ्ठावीस वर्षीय विवाहित महीलेने राहत्या घरी गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.१६) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

वाळूजच्या वडगाव कोल्हाटीत विवाहितेची आत्महत्या

sakal_logo
By
आर. के. भराड

वाळूज, (जि. औरंगाबाद: एका अठ्ठावीस वर्षीय विवाहित महीलेने राहत्या घरी गळफास घेऊन घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.१६) रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

खरीप गेले, तर रब्बीची पेरणी लांबली; परतीच्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान 

वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील क्रांतीनगरात राहणारी ज्ञानेश्वरी चंद्रकांत गडदे (वय २८) या महिलेचा पती अशोक गडदे हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील कंपनीत कामाला गेला होता. तर सासरा अशोक रानबा गडदे जवळच असलेली टपरी चालवत होता. करण व अर्जून या दोन मुलांना घराच्या बाहेर जायचे सांगून तिने घर आतून बंद केले. व घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

आई घर उघडत नसल्याने करण, अर्जून यांनी शेजारी राहणाऱ्या मावशीला सांगितले. त्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेली दिसली. या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत गंभिरराव व डी. एम. राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत ज्ञानेश्वरी गडदे हिला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

 औरंगाबादच्या जैन इंटरनॅशनल स्कूलची मनसेकडून तोडफोड  

(संपादन ः सुषेन जाधव)