
महिला अत्याचार विरोधी परिषद
औरंगाबाद : भीमा कोरेगाव घटनेनंतर आतापर्यंत गप्प असलेले अनेक राजकारण्यांना भीमा कोरेगाव प्रकरण आताच का आठवले़, आता अचानक वंचितांना न्याय देण्याची आणि जवळ करण्याची भाषा काही राजकारणी, कसे बोलू लागले अशी टीका अंजलीताई आंबेडकर यांनी केली.
भीमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान व वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने महिला अत्याचार विरोधी परिषद मंगळवारी (ता. २५) पार पडली. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून अंजलीताई आंबेडकर बोलत होत्या़. परिषदेचे उद्घाटन सिल्लोड तालुक्यातील अत्याचारित कुटुंबातील सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी वंचित महिला आघाडीच्या राज्य अध्यक्षा रेखाताई ठाकूर तर प्रमुख वक्त्या अंजली आंबेडकर व वंचित महिला आघाडीच्या अरुंधती शिरसाठ, फिरदोस फातेमा खान, सरस्वती हरकळ, अनिता पवार, महिला अध्यक्षा लताबाई बामणे यांची विचारपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा : एमआयएमच्या खासदारांना इतकं भडकायला काय झालं : पहा Video
जातिव्यवस्थेची काळी किनार
अंजलीताई आंबेडकर म्हणाल्या, की गेल्या काही वर्षांत महिलांवर अत्याचार झाले, याला जातिव्यवस्थेची काळी किनार जबाबदार आहे़. सर्व तपासयंत्रणा, सर्व न्यायव्यवस्था महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचारात विरोधात ठामपणे पाठीशी उभा राहत नाही़, अशी खंत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...
साक्षीदार उभे करा.
महिलांवरील अत्याचार प्रकरणी न्यायव्यवस्थेतून पळवाटा शोधल्या जात असून सिल्लोड, सोलापूर व हिंगणघाट येथे घडलेल्या घटनांमागे जातीयव्यवस्थेचे पैलू कारणीभूत आहेत. जिथे-जिथे स्त्रियांवर अत्याचार होतील त्या ठिकाणी महिला व पुरुषांनी एकत्र येऊन भूमिका घ्यावी. मोर्चे काढणे, आंदोलन करून होणार नाही तर त्याठिकाणी जाऊन तपास करणे, साक्षीदारांना तयार करणे, त्यांना लागणारी सर्व प्रकारची मदत करणे महत्त्वाचे आहे. असे झाले तरच अत्याचाराविरोधात यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : योगी ठाकूर यांना ही जाब विचारा - इम्तियाज जलील
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अरुंधती शिरसाठ व कार्यक्रमाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा लताताई बमणे यांनी केले. शाहिस्ता कादरी यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात तर समाजसेवी फिरदोस फातेमा यांनी महिलांना अन्यायाविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन केले़. यावेळी वंचित बहुजन आघाडी महिला कार्यकारिणीची घोषणा अंजली आंबेडकर यांनी केली. कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती होती.