आधीच नवरा, दोन मुले असताना दुसऱ्याशी लग्न : त्यानंच काढलं शोधून

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 February 2020

लग्नाच्या बोलाचालीत पाटील कुटुंबाकडून संशयित महिलेने एक लाख रुपये रोख घेतले व नववधूचे नाव कविता रमेश देठे (रा. विसरुळ-मंगरूळ ता. चिखली, जि. बुलढाणा) असे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता सातारा परिसरातील महादेव मंदिरात लग्नही लावण्यात आले.

औरंगाबाद : नवरा, दोन मुले असतानाही खोटे नाव व कागदपत्रे तयार करीत दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून त्याला सव्वा लाखाचा गंडा घालून पसार होणाऱ्या विवाहितेसह दलाल महिला व अन्य पुरुषाविरुद्ध गुन्हा नोंदण्यात आला. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या नवऱ्याने तब्बल वर्षभरानंतर बायकोचा शोध घेऊन तिला बुधवारी (ता. 12) क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात दिले. सीमा उर्फ कविता अनिल रेसवाल (28, रा. रोहिदासनगर, मुकुंदवाडी) असे त्या विवाहितेचे नाव आहे. 

राज ठाकरे अडकले, कार्यकर्ते भडकले

या प्रकरणात श्रीराम पाटील (26, रा. जवखेडासिम ता. एरंडोल जि. जळगाव) याने दिलेल्या तक्रारीनुसार, श्रीरामचे वडील वीरभान पाटील यांना जानेवारी 2019 मध्ये दलाल महिला सीमा राठोडने फोन केला. तुमच्या मुलाचे लग्न करायचे आहे का? त्यावर वीरभान यांनी होकार देत मुलगी पाहण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार संशयितांनी 5 फेब्रुवारी 2019 ला मुलगी पाहण्यासाठी श्रीराम, त्याचे वडील, काका व इतर नातेवाईक सिद्धार्थ गार्डनला आले.

व्हायरल क्लिपमधल्या अमोलचा गुंता सुटेना

तेथे लग्नाच्या बोलाचालीत पाटील कुटुंबाकडून संशयित महिलेने एक लाख रुपये रोख घेतले व नववधूचे नाव कविता रमेश देठे (रा. विसरुळ-मंगरूळ ता. चिखली, जि. बुलढाणा) असे सांगितले. त्याच दिवशी सायंकाळी 7 वाजता सातारा परिसरातील महादेव मंदिरात लग्नही लावण्यात आले. लग्नामध्ये वधूच्या गळ्यात 15 हजार रुपये किमतीचे नऊ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र घातले; तसेच शंभर रुपयांच्या बॉन्डवर लग्न झाल्याचा एक लाख रुपये रोख दिल्याचे लिहून घेतले. 

बसस्थानकातून गेली पळून 

11 फेब्रुवारी 2019 ला श्रीराम हा वधूला माहेरी सोडण्यासाठी औरंगाबाद मध्यवर्ती बससथानकावर आला. चिखली जाणाऱ्या बसची वाट पाहत असताना कविता अचानक कुठेतरी गेली. घाबरलेल्या श्रीरामने कविताचा शोध घेतला व दलाल सीमालाशी वेळोवेळी संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र संपर्क झाला नाही. त्यानंतर श्रीरामने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतरही श्रीराम हा पत्नीचा शोध घेत होता.

आदित्य ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

त्यावेळी दलाल महिला सीमा राठोड अशा प्रकारे लग्न लाऊन लोकांना गंडा घालत असल्याची तसेच कविताचेही लग्न झालेले असून, तिला दोन मुले असल्याची माहिती श्रीरामला मिळाली. प्रकरणात पत्नी कविता रमेश देठे ऊर्फ सीमा अनिल रेसवाल, दलाल सीमा रवी राठोड ऊर्फ सविता किसन माळी आणि अमोल रमेश देठे या तिघांविरुद्ध क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदण्यात आला. दरम्यान, वधू सीमा ऊर्फ कविताला शनिवारपर्यंत (ता. 15) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला ए. मोटे यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Ran Away From Family High Court News Aurangabad