कोरोनामुळे झाली रंगभुमी " दीन ', रंगमंच अन रंगमंदीरे सुनेसुने 

file photo
file photo

औरंगाबाद - दर वर्षी २७ मार्च रोजी जागतिक रंगभुमी दिन साजरा केला जातो. कोरोनाच्या महामारीने रंगभुमीवरील कलाकारांच्या चेहऱ्यावर जागतिक रंगभुमी दिनी रंग तर लागला नाहीत. उलट कोरोनाने साऱ्या जगाचेच रंग उडाले आहेत. यामुळे रंगमंच आणि रंगमंदिरे सुनीसुनी भासत आहेत. 

समाजात घडणाऱ्या घटना, घडामोडी रंगकर्मी रंगभुमीवर सादर करून लोकरंजनाबरोबर समाज प्रबोधनाचे काम करत असतात, म्हणुन रंगभुमी हा समाजजीवनाचा आरसा असतो. 

युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटरने प्रथम १९६१ मध्ये हा दिवस जाहिर केला आणि १९६२ मध्ये पहिला जागतिक रंगभुमी दिन साजरा करण्यात आला होता. शुक्रवार (ता.२७) जागतिक रंगभुमी दिन, मात्र जगभरात कोरोनाच्या महामारीने रंगभुमीचे आणि रंगकर्मींचे रंगच बदलले आहेत. 

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या औरंगाबाद शाखेच्या व्हॉटसअप ग्रुपवर सातार येथील रंगकर्मी तुषार भद्रे यांनी शुभेच्छा संदेशात जागतिक रंगभुमी दिन आणि कोरोनाची सांगड घालताना लिहलेले आहे की, 
जागतिक रंगभूमी दिन साजरा कोठे करू ? सारे रंगमंच बंद आहेत आणि मनमंचावर..रण माजलंय. एक अतिसूक्ष्म कण. कणा कणाने गिळून टाकतोय. अस्तित्व माणूस नावाच्या बेटांचे...त्यातच मी उभा आहे. कवण्यासाठी अस्तित्व रंगभावाचे....आज जागतिक रंगमंच आहे. प्रत्येकाचं घरटं...नीरव शांततेची एक पोकळी . हाच अवकाश आणि संथ गतीचा जीवघेणा काळ...खेळ झालाच पाहिजे....पडदा पडेपर्यंत लढलेच पाहिजे . प्रेक्षागृह रिकामे असले तरी ! श्वासात श्वास असे पर्यंत...निसर्गाचे श्वास भरून घेत आणि त्याची माफी मागत. ढवळून निघालेला मनभावमंच. सावरलाच पाहिजे.....आता टू बी ऑर नॉट टूबी. नाही चालणार...उसमे क्या है ! नाही चालणार... वाद्य परजून पुन्हा . मी ते तुफान वाजवणार...आजचा खेळ प्रत्येकजण खेळतोय जागतिक मनमंचावर.जिंकणार हा खेळ,मिळविणार प्रचंड हशा आणि टाळ्या. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

रंगकर्मी म्हणतात... 

 डॉ. देवदत्त म्हात्रे : कोरोनाने साऱ्या विश्‍वाचे रंग बदलून टाकले आहेत, यात आमचेही रंग उडाले आहेत. माणुसकीचे रंग कायम रहावेत यासाठी सरकारने लॉकडाऊन केले आहे. सरकार आवाहन करत आहे त्यप्रमाणे स्वत: ला आणि कुटूंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी बाहेर न फिरता समाजालाही सुरक्षित ठेवण्यासाठी घराबाहेर पडू नये. कलावंत तर बंदीस्त झाले आहेतच. 

रमाकांत मुळे : दरवर्षी सर्व रंगकर्मी एकत्र येऊन कार्यक्रमाचे आयोजन करायचो, मात्र यंदा कोरोनामुळे आम्ही एकत्रीतपणे रंगभुमी दिन साजरा करू शकलो नाही. मात्र कोरोना मुळे चिंतन करायला, नाट्यलेखकांना नवीन विषयांचा शोध घेण्यासाठी वेळ मिळाला आहे. कलावंत नेहमीच बिझी असतो, या निमित्ताने वेळ मिळाला आहे तो त्यांनी सत्कारणी लावावा. 

पद्मनाभ पाठक : कोरोनामुळे सर्वांनाच विचार करायला लावला आहे. कलाकारांनाही स्वचा शोध घेण्यासाठी वेळ मिळाला आहे. आपण सादरीकरण करतो तो कलाविष्कार इतरांच्या तुलनेमध्ये कसा आहे, आपले कुठे चुकतंय , आपण जे करतोय ते अधिकाधिक चांगले करण्यासाठी काय करावे लागेल याचा शोध घेण्याची यानिमित्ताने संधी मिळाली आहे. जसे शास्त्रीय संगीत, शास्त्रीय नृत्याचा नियमित अभ्यास (रियाज) केला जातो. तसा नाटकाचा रियाज केला जात नाही. नाटकाची प्रॅक्टिस केली जाते , सध्या कोरोनामुळे मिळालेल्या वेळेचा आपण नाटकाच्या रियाजासाठी उपयोग केला तर खऱ्या अर्थाने रंगभुमी दिन साजरा केल्याचे समाधान मिळेल. 

सुजाता देशमुख : जीवनात नाट्य असते, प्रत्येकजण आयुष्यात नाटक जगत असतो. आज कोरोनामुळे जरी रंगकर्मी रंगमंचावर नाटक सादर करु शकले नाहीत तरी मनोमंचावर भुमिका सादर करतो. आज देशावर, जगावर कोरोनाचे संकट आले आहे. यासाठी प्रत्येकाने आपापली भुमिका योग्य पद्घतीने पार पाडावी. एक कलावंत , नागरिक म्हणुन स्वत:चे आणि इतरांचे कोरोनापासून रक्षण केले पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com