esakal | होय! एमआयटीचे तीनशे विद्यार्थी रोज घेतायत ई ग्रंथालयाचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News MIT E Library

एमआयटी महासंचालक मुनीश शर्मा यांनी सांगितले कि, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आता घरबसल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्स अभ्यासता येऊ लागले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान आणि संशोधन कार्याबाबतीत स्वतःला अपडेट ठेवावे लागते. ते ई लायब्ररी सुविधेने शक्य झाले आहे.

होय! एमआयटीचे तीनशे विद्यार्थी रोज घेतायत ई ग्रंथालयाचा लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सगळीच पुस्तके विकत घेणे शक्य नसते. यावेळी उपयोगी पडते ती ई लायब्ररी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये एमआयटी इंजिनिअरिंगमध्ये ई ग्रंथालयाची उपलब्धता करुन देण्यात आली आहे. वेब स्टॅटिस्टीक्सनुसार लॉकडाऊन काळात रोज ३०० विद्यार्थी आणि ७० प्राध्यापक ऑनलाईन ग्रंथालयाचा उपयोग करत आहेत.

शैक्षणिक संस्थेसाठी ग्रंथालय म्हणजे अति महत्वाचा स्रोत असतो. कोविड-१९ मुळे ग्रंथालयाला प्रत्यक्ष भेट देणे अशक्य होत आहे. म्हणून आता एमआयटी समूहाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सेंट्रल ग्रंथालयाची ऑनलाईन उपलब्धता करून देण्यात आली आहे.

हेही वाचा : थेट कोरोना बाधितांच्या वाॅर्डातुन, असा आहे रुग्णांचा दिनक्रम

एमआयटी महासंचालक मुनीश शर्मा यांनी सांगितले कि, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना आता घरबसल्या आंतरराष्ट्रीय जर्नल्स अभ्यासता येऊ लागले आहेत. अभियांत्रिकी क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान आणि संशोधन कार्याबाबतीत स्वतःला अपडेट ठेवावे लागते. ते ई लायब्ररी सुविधेने शक्य झाले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अभियांत्रिकी क्षेत्रात अव्व्ल असणाऱ्या प्रोफेशनल सोसायटीचे संशोधन पेपर्स उपलब्ध झाले आहेत. अमेरिकन सोसायटी ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स (एएससीइ), अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (एएसएमइ), असोसिएशन ऑफ कम्प्युटिंग मशिनरी (एसीएम) यांच्या डिजिटल लायब्ररी, जर्नल्स, मॅगझिन्स, कॉन्फरन्स प्रोसेडिंग्स, बुक्स इत्यादींची उपलब्धता आहे. सायन्स डायरेकट, डेलनेट, स्प्रिंजरलिन्क आणि निम्बस या प्रसिद्ध प्रकाशकांचे साहित्य आणि डिजिटल ग्रंथालय यांचा ऍक्सेस विद्यार्थ्यांना घरबसल्या मिळाला आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सहाय्यक ग्रंथपाल अरुण थोरात सांगतात, एकूण १८१४ आंतरराष्ट्रीय जर्नल्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. दोन नामांकित डिजिटल लायब्ररीचा ऍक्सेस आहे. ज्याद्वारे लाखो संशोधन पेपर्स मिळतात. ई-लायब्ररीसाठी वार्षिक वीस लाख रुपयांची वर्गणी आहे. विविध विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्प विकसित करायला ई-लायब्ररीचा उपयोग होतो. गेल्या दीड दशकांपासून नामांकित उद्योग क्षेत्रातील अभियंतेसुद्धा एमआयटी ई-लायब्ररीचा त्यांच्या संशोधन कार्यासाठी उपयोग करतात.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

go to top