रक्तदानासाठी सरसावले तरुण ; जनजागृतीचाही केला निर्धार 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीला जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने सगळेजण घरात आहेत. त्यामुळे रक्तदात्यांकडून रक्तदान थांबल्याने उपचारासाठी दाखल होणाऱ्यांसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन काही तरुणांनी ब्लड बॅंकेलाच आपल्या घरी बोलावत रक्तदान केले. विशेष म्हणजे यासाठी आम्ही जनजागृती देखील करणार आहोत, असा निर्धारही या तरुण मंडळींनी केला आहे. 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरवातीला जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लागू करण्यात आल्याने सगळेजण घरात आहेत. त्यामुळे रक्तदात्यांकडून रक्तदान थांबल्याने उपचारासाठी दाखल होणाऱ्यांसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन राहुल येडे पाटील व काही तरुणांनी ब्लड बॅंकेलाच आपल्या घरी बोलावत रक्तदान केले. विशेष म्हणजे यासाठी आम्ही जनजागृती देखील करणार आहोत, असा निर्धारही या तरुण मंडळींनी केला आहे. 

 हेही वाचा : गुढीऐवजी उभारा भगवी पताका

जगावर आलेल्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशपातळीवरील सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. विविध सामाजिक संघटनाही त्यासाठी काम करीत आहेत. जनतेने आपल्या घरातच बसणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले जात आहे.

हेही वाचा : कोरोनाबद्दल साहित्यिक म्हणतात..

त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र दुसरीकडे रुग्णालयांमध्ये स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्यांची संख्या अचानकपणे घटली. त्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. याअनुषंगाने दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह अन्य काही लोकप्रतिनिधींनी रक्तदान करण्यासंदर्भात आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नीलेश राऊत, गणेश घुले, प्रतीक राऊत यांनी तातडीने घाटी रुग्णालयात जाऊन रक्तदान केले.

हेही वाचा कोरोनामुळे मिळेना शालेय पोषण आहार..  

हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याबाबत मंत्री श्री. टोपे यांनी त्यांचे आभारही मानले. मात्र, दोन आणि चार जणांनी रक्तदान करून भागणार नाही, तर याबाबत जनजागृती करावी लागेल, यासाठी तरुणांच्या एका ग्रुपने बुधवारी (ता.२५) खासगी ब्लड बँकेला आपल्या घरी बोलावून रक्तदान केले. शिवाय, रक्त कमी पडू नये, यासाठी या संचारबंदीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले. या ग्रुपमध्ये राहुल येडे पाटील, अक्षय जायभाये, नितीन दहिहंडे, भास्कर तोंडे, अजिंक्य केतकर, विराज शेटे, नागेश माने यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Blood Donation Awareness Coronavirus Aurangabad News