औरंगाबाद : खड्ड्यात दुचाकी आदळून युवकाचा मृत्यू   

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

ढाब्यावरून जेवण करून मूळ गावी परताना नाचनवेल बसस्थानकाजवळील खड्ड्यात दुचाकी आदळून अभिषेक मोरे याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १८) रात्री साडे-अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सणासुदीत जवखेड बुद्रुक (ता. कन्नड) गावावर शोककळा पसरली.

नाचनवेल (औरंगाबाद) : ढाब्यावरून जेवण करून मूळ गावी परताना नाचनवेल बसस्थानकाजवळील खड्ड्यात दुचाकी आदळून अभिषेक मोरे याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १८) रात्री साडे-अकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सणासुदीत जवखेड बुद्रुक (ता. कन्नड) गावावर शोककळा पसरली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
नाचनवेल बसथांबा ते चौफुली या दीड किलोमीटरचा रस्ता खड्डेमय होऊन खडी उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर आठवडाभरात दोनजण गंभीर जखमी झाले असताना आता तर एका युवकाचा बळी गेला. बुधवारी रात्री साडेअकराच्या अपघातात अभिषेक रावसाहेब मोरे (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मृत अभिषेक मोरे कन्नड तालुक्यातील औराळा येथे नातेवाइकाच्या रक्ततपासणी लॅबवर काम करत होता. दिवाळीची सुटी असल्यामुळे भाऊबीजेसाठी जवखेडा येथे आला होता. दोघा मित्रांसह अभिषेक चौफुलीवर जेवून परतताना हा अपघात जिवावर बेतला. दुचाकी खड्ड्यात आदळल्याने अभिषेक खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याच्यावर तत्काळ आदर्श रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी सिल्लोड येथील खासगी रुग्णालयामध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अभिषेकवर जवखेडा बुद्रुक येथे गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies after colliding with bike pit