esakal | अंधश्रध्देचा बळी ; महादेवाच्या पिंडीवरचं युवकाने गळा चिरुन केेली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

A youth has committed suicide by slitting his throat at Mahadev's pindi in Paithan city

पैठण शहरातील गागाभट्ट चौकातील गोदाकाठ जवळील पुरातन गंगेश्वर या महादेवाच्या पिंडीवर नंदु देविदास घुंगासे या युवकाचा गळा चिरुन मृतदेह पडला असल्याची घटना घडली होती.

अंधश्रध्देचा बळी ; महादेवाच्या पिंडीवरचं युवकाने गळा चिरुन केेली आत्महत्या

sakal_logo
By
चंद्रकांत तारू

पैठण (औरंगाबाद) : महादेवाच्या पिंडीवर युवकाने गळा चिरुन अंधश्रध्देतून आत्महत्या केली असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली आहे. त्यामुळे ही घटना हत्या नव्हे तर आत्महत्या आहे. असे स्पष्टीकरण पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी शुक्रवारी (ता.11) दिली आहे. 

हे ही वाचा : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवार तत्परतेने धावून येतात 

पैठण शहरातील गागाभट्ट चौकातील गोदाकाठ जवळील पुरातन गंगेश्वर या महादेवाच्या पिंडीवर नंदु देविदास घुंगासे या युवकाचा गळा चिरुन मृतदेह पडला असल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता गंगेश्वर मंदिरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शी भाविकांची या घटनेच्या तपासा बद्दल माहिती घेतल्यानंतर भाविकांनी दिलेल्या साक्षीवरुन आत्महत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तसेच वैद्यकीय अहवाल व जखमा यावरुन ही बाब स्पष्ट झाली आहे, असे ही पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा : जालना जिल्ह्यात भीषण अपघात; एक ठार, तर चार जखमी

दरम्यान ही घटनेची वार्ता शहरभर पसरल्यानंतर सदर युवकाची गंगेश्वर मंदिरात हत्या झाल्याच्या चर्चेला उधाण आले. मंदिरात हत्या कशी व कुणी केली असावी असे नानाविध प्रश्न नागरिकांच्या चर्चेतून येऊ लागले. या हत्येच वृत कळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी पोलिस पथकासह पैठण येथे धाव घेतली. त्यामुळे या हत्येच्या घटनेचे गुढ अधिकच वाढत गेले. परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात महादेवाच्या पिंडीला रक्ताभिषेक घालून प्रसन्न करण्यासाठी हा अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. या तपासात उपविभागीय पोलिस अधिकारी गोरक्ष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पवार, सहायक पोलिस निरीक्षक सुदाम वारे, फौजदार रामकृष्ण सागडे, पोलिस कॉन्स्टेबल गोपाल पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

पोलिसांनी केला तातडीने तपास !

पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ दिवसापूर्वी पैठण शहरापासून पाच किलो मीटर अंतरावर असलेल्या गोदाकाठी असलेल्या जुने कावसन या गावात निवारे कुटुंबियांचे तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा हत्येची घटना घडल्यामुळे पोलिस सतर्क झाले. पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी घटनेच्या खोलवर जाऊन केलेल्या तपासामुळे ही घटना आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले व हत्याकांडानंतर घडलेल्या या घटनेच्या तपासाला पुर्णविराम मिळाला.

संपादन - सुस्मिता वडतिले