esakal | जालना जिल्ह्यात भीषण अपघात; एक ठार, तर चार जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident In Wadigodri

औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री (ता.अंबड) येथील उड्डाण पुलावर शहागडकडून औरंगाबादकडे जात असलेल्या कारला अपघात होऊन औरंगाबाद येथील एक ठार, तर चार जखमी झाले.

जालना जिल्ह्यात भीषण अपघात; एक ठार, तर चार जखमी

sakal_logo
By
दिलीप दखने

वडीगोद्री (जि.जालना) : औरंगाबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री (ता.अंबड) येथील उड्डाण पुलावर शहागडकडून औरंगाबादकडे जात असलेल्या कारला अपघात होऊन औरंगाबाद येथील एक ठार, तर चार जखमी झाले. या अपघातात शिव अग्रवाल हे जागीच ठार झाले असुन मलिम खाँन, ओम अग्रवाल, मोहंमद कैफ, काशित पाटील (रा. औरंगाबाद) हे जखमी असे झाले आहेत. हा अपघात शनिवारी (ता.१२) सकाळी सात वाजता झाला आहे. यामध्ये कारच्या पाठीमागील भागात जोरदार धडक बसून या मधील एक ठार तर चार जखमी झाले आहेत.

जखमींना पाचोड (जि.औरंगाबाद) येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप काळे (पाचोड) यांनी जखमींवर उपचार केले. पाचोड येथील टोल नाका रुग्णवाहिका चालक अप्पासाहेब गाडेकर, महेश जाधव यांनी जखमींना पाचोड येथे उपचारासाठी दाखल केले. कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली असल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. त्या वाहनाचा गोंदी पोलिस शोध घेत आहेत. घटनास्थळी शहागड पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image