
बीड, अहमदनगर जिल्ह्यातील गावात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर सुरू आहे. या जिल्ह्यातील काही भागात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात काही जण बळी पडलेले असतानाच आता कळंब तालुक्यातील पाथर्डी भागात बिबट्याचे दर्शन झाल्याची अफवा आणि कळंब तालुक्यातील कोथळा शिवारातील रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
कळंब (उस्मानाबाद) : कळंब तालुक्यातील पाथर्डी भागात बिबट्या दृष्टीस पडल्याच्या अफवेने धुमाकूळ घातल्याने नागरिकांनी स्वतःला कोंडून घेतले आहे. अफवेचे पेव फुटल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी पाथर्डी शिवारात भेट देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे नसून ते तरस या वन्यप्राण्यांचे असल्याचा निष्कर्ष काढल्याने नागरिकांच्या मनामधील भीतीचे वातावरण निवळले आहे.
हे ही वाचा : पैशाची मागणी करत पोलिस कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, चार आरोपींना अटक
बिबटय़ाचा वावर
बीड, अहमदनगर जिल्ह्यातील गावात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर सुरू आहे. या जिल्ह्यातील काही भागात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात काही जण बळी पडलेले असतानाच आता कळंब तालुक्यातील पाथर्डी भागात बिबट्याचे दर्शन झाल्याची अफवा आणि कळंब तालुक्यातील कोथळा शिवारातील रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पाथर्डी येथील एक तरुण रविवार रात्री गावकडे आला होता. रात्रीच्या २ वाजून ४० मिनिटाने बिबट्या भेटल्याचे गावातील नागरिकांना त्यांनी सांगितले. बीड, अहमदनगर जिल्हा ओलांडून कळंब तालुक्यात अन तीही पाथर्डी गावात कसा काय बिबट्या येईल असे म्हणत मनाला धीर देत नागरिकांनी ही अफवा असल्याचे समजून घेतले.
हे ही वाचा : Corona Update : एकाचा मृत्यू, जालना जिल्ह्यात २८ कोरोनाबाधितांची भर
दरम्यान सोमवारी वसंत काळे हे शेतातील दिवसा उसाला पाणी देत होते. उसाच्या सरीत पाणी मोडले की उसातून काही तरी धूम ठोकून गेल्याचा भास त्यांना झाला. घाबरून गेल्याने ते बेशुद्ध पडले. ही बातमी गावकऱ्याना मिळताच पोलिस पाटील बालाजी चिंचकर यांनी त्वरित वनविभागाचे अधिकारी श्री मुंडे आदींना माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने आज पाथर्डी शिवारात धांडोळा घेतला.
बिबट्याच्या भीतीने शेतात पिकाला पाणी दयालला जाण्यास शेतकरी भीत आहेत. मंगळवारी उसाच्या शेतात बिबट्या समजून वनविभागाच्या पथकाने पाऊलखुणा शोधल्या असता त्या तरस या वन्यप्राण्यांचे असल्याचे निदर्शनास आले. पथकाने भेदरलेल्या शेतकऱ्यांना बिबट्याच्या पाऊलखुणा नसून त्या अन्य प्राण्याच्या असल्याच्या सांगितल्यानंतर सुटकेचा नि:श्वास शेतकऱ्यांनी सोडला.
संपादन - सुस्मिता वडतिले