Corona Update : एकाचा मृत्यू, जालना जिल्ह्यात २८ कोरोनाबाधितांची भर

उमेश वाघमारे
Wednesday, 9 December 2020

जालना जिल्ह्यात मंगळवारी (ता.आठ) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. नवीन २८ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत.

जालना : जिल्ह्यात मंगळवारी (ता.आठ) एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. नवीन २८ कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून आले आहेत. उपचारानंतर १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मंगळवारी (ता.आठ) ही एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. २८ नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.

औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक तुरा, ‘औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’टॉप टेनमध्ये

यात जालना शहरातील तब्बल १६ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्यातील गोंदेगाव, वखारी, इंदेवाडी येथील प्रत्येकी एक, मंठा शहरातील दोन, घनसावंगी शहरातील एक, अंबड तालुक्यातील एक, हिवराबळी येथील एक व इतर जिल्ह्यातील बुलडाणा येथील दोन व औरंगाबाद येथील एकाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण १२ हजार ६६४ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले. दुसरीकडे मंगळवारी १८ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले, त्यांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत ११ हजार ९३८ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३९९ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

जालना कोरोना रुग्ण आकडेवारी
............
एकूण कोरोनाबाधित ः १२ हजार ६६४
एकूण कोरोनामुक्त ः ११ हजार ९३८
एकूण मृत्यू ः ३२७
उपचार सुरू ः ३९९
..........

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Covid 28 New Cases Recorded In Jalna District