वाचा कोणी घातला आ. पडळकरांच्या प्रतीमेस दुग्धाभिषेक..!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

भाजपाचे विधान परिषदेचे आमंदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ धनगर समाजाने पुढाकार घेतला आहे. आज (ता.३०) मंगळवारी शिवाजी चौकात आ. पडळकर यांच्या प्रतिमेस धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालून त्याचे समर्थन केले.

माजलगाव (जि.बीड) : भाजपाचे विधान परिषदेचे आमंदार गोपिचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ धनगर समाजाने पुढाकार घेतला आहे. आज (ता.३०) मंगळवारी शिवाजी चौकात आ. पडळकर यांच्या प्रतिमेस धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घालून त्याचे समर्थन केले.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आ. पडळकर यांचा निषेध करत धनगर समाजाबद्दल असभ्य भाषा वापर करुन आ. पडळकरांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले होते.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

त्या पार्श्वभूमीवर आज  मंगळवारी सकाळी येथील शिवाजी चौकात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आ. पडळकर यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला.  

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

 यावेळी सरपंच ज्ञानेश्वर सरवदे मल्हार सेनेचे आशोक डोणे, नारायणराव भले, मल्हार धनगर समाजाचे संतोष देवकते, मल्हार सेनेचे विलास नेमाणे, सरपंच किसन वगैरे, सरपंच कल्याण कसपटे, कल्याण गवते, सुखदेव मुळे, बाबा हांडे, मुक्तीराम आबुज, मंजुळदास कुंडकर, तात्या पांचाळ, शंकर चोरमले, गजानन देवकते, गणेश सातपुते यांची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:  Padalkar support is an initiative of Dhangar Samaj