‘तो’ निलंबीत पोलिस अवैध दारुसह अटकेत 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 29 April 2020

त्यांच्याकडून १४ हजाराची विविध कंपनीची विदेशी दारु जप्त करून दोघांविरुद्ध कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : लॉकडाउनच्या काळात अवैध दारू विक्री करणाऱ्या निलंबित पोलिसासह दोघांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून १४ हजाराची विविध कंपनीची विदेशी दारु जप्त करून दोघांविरुद्ध कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बरबडा (ता.नायगाव) शिवारात सोमवारी (ता. २७) सायंकाळी केली.

लॉकडाउनमध्ये गेल्या महिनाभरापासून दारूविक्री, बियरबार, वाईन शॉप बंद आहेत. या काळातही अवैध दारू विक्रीला अक्षरशः जिल्ह्यात महापूर आला आहे. त्यातच एका निलंबित पोलिसालाच विदेशी दारू अवैध पद्धतीने घेऊन जात असताना सोमवारी (ता. २७) पोलिसांनी अटक केली. या पोलिसांबरोबरच त्याच्या एका साथीदारालाही अटक केली असून त्यांच्याकडून १४ हजारांची दारू जप्त केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नायगाव तालुक्यातील बरबडा परिसरात कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोमवारी  (ता. २७) गस्त घालत होते. 

हेही वाचा धक्कादायक : हिंगोलीत पुन्हा दोघांना कोरोनाची लागन, संख्या पोहचली १६ वर

कृष्णूर- बरबडा ते वजीरगाव रस्त्यावर कारवाई

सायंकाळी सहाच्या सुमारास कृष्णूर- बरबडा ते वजीरगाव मार्गाने मोटरसायकलवर दोघेजण विदेशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बरबडा बीटचे हवालदार अशोक दामोदर, भार्गव सुवर्णकार, विजय पवार आणि गृहरक्षक दलाचे जवान परमेश्वर राठोड यांनी वजीरगाव येथील शेतकरी शिवाजी पाटील ढगे यांच्या शेताजवळ सापळा लावला. 

निलंबीत पोलिसच करत होता अवैध दारु वाहतुक

यावेळी बरबडाकडून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराला अडविले. त्यांची विचारपूस केली असता त्याती एकजण निलंबीत पोलिस असल्याचे समजले. त्यांच्याजवळ असलेल्या पीशवीची तपासणी केली असता त्यात विविध कंपनीची विदेशी दारु सापडली. ही दारु काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी हे दोघेजण घेऊन जात असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी जुन्या वापराची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच२६-२४६१) जप्त केली. 

येथे क्किल कराचिंता वाढली : आणखी आठ पॉझिटिव्ह, औरंगाबादेत 128 रुग्ण

कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

ताब्यात घेतलेला विकास विजय साळवे (वय ३०) राहणार सिरंजनी तालुका हिमायतनगर हा निलंबित पोलीस कर्मचारी असल्याचे समजले. त्याच्याबरोबर राम मारुती कांबळे राहणार पांडुरंगनगर, नांदेड यालाही ताब्यात घेतले. या दोघांना बीट हवालदार श्री दामोदर यांनी मुद्देमालासह कुंटुर पोलिस ठाण्यात हजर केले. श्री. दामोधर यांच्या फिर्यादीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक के. एस. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. दामोधर करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ‘He’ suspended police arrested with illegal liquor Nanded news