esakal | Covid 19 : हिंगोलीत दोन, कळमनुरीमध्ये पाच, वसमतमध्ये चार तर सेनगावातील एकाला बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

12 new Covid 19 cases Hingoli District

जिल्ह्यातील आठ जण कोरोनामुक्त

Covid 19 : हिंगोलीत दोन, कळमनुरीमध्ये पाच, वसमतमध्ये चार तर सेनगावातील एकाला बाधा

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली  : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. तीन) बारा जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये हिंगोली येथील दोन, कळमनुरीतील पाच, वसमतमधील चार तर सेनगाव तालुक्यातील एका तरुणाचा समावेश आहे. दरम्यान, आठ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील भरती असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ३३ वर्षीय महिला व ११ वर्षांचा तिच्या मुलाचा समावेश आहे. हे दोघेही ता. २९ जूनला हैद्राबाद येथून नातेवाइकाला भेटण्यासाठी हिंगोली येथे आले होते. त्यांना सर्दी, ताप, खोकला असल्याने ता. १ जुलैला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर येथे पाच व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी प्राप्त अहवालावरून स्पष्ट झाले. यातील दोन रुग्ण ४५ वर्षीय पुरुष व दहा वर्षांची मुलगी विकासनगर येथील रहिवासी असून, औरंगाबाद येथून गावी परतले आहेत. इतर तिघे जण तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असून, मुंबईवरून परतले आहेत.

पाच असे पदार्थ जे जगभरात मानले जातात हेल्दी, तुमच्याही जेवणात असायलाच हवेत

याशिवाय वसमत कोविड हेल्थ सेंटर अंतर्गत चार व्यक्तींना नव्याने लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे चौघे जण बहिर्जीनगर येथील कोरोना व्यक्तीच्या जवळील संपर्कातील आहेत. यामध्ये ७१ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला व ३४ वर्षीय महिला आणि १४ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. सेनगाव येथील क्वारंटाइन सेंटर येथे एका २५ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून, तो केंद्रा बुद्रूक येथील आहे. दरम्यान, कळमनुरी येथे क्वारंटाइन केलेले सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुटी देण्यात आली. यामध्ये कवडा पाच, गुंडलवाडी दोन, यांचा समावेश आहे. वसमत येथील एक रुग्ण बरा झाला आहे.  

एक कप चहात फक्त दोन गोष्टी अॅड करून पहा, आरोग्यासाठी आहे फायद्याचे

वसमत येथे सहा, कळमनुरी केअर सेंटर येथे अकरा पुन्हा कळमनुरी कोविड सेंटर येथे दोन अशा एकूण १९  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. लिंबाळा अंतर्गत कोअर सेंटर येथे दहा रुग्णावर उपचार सुरू आहेत. यामध्ये तालाब कट्टा दोन, रिसाला दोन, केंद्रा बुद्रूक दोन, प्रगतिनगर एक, भांडेगाव दोन, पिंपळ खुटा एक यांचा समावेश आहे. तसेच सेनगाव येथे सहा रुग्णावर उपचार सुरू आहेत. यात मन्नास पिंपरी एक, ताक तोडा एक, केंद्रा बुद्रूक दोन, लिंग पिंपरी दोन यांचा समावेश आहे. औंढा येथे चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात  एकूण ४,९९२ व्यक्तींना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४,४४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ४,३०० रुग्णांना घरी सुटी देण्यात आली आहे. आजघडीला ६८४ रुग्णावर उपचार सुरू आहेत. २९३ रुग्णांचे थ्रोट नमुने येणे बाकी असल्याचे डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.