एक कप चहात फक्त दोन गोष्टी अॅड करून पहा, आरोग्यासाठी आहे फायद्याचे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जून 2020

आतापर्यंत चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, फ्लेवर वापरले असतील पण हा आरोग्यदायी चहा एकदा करून बघाच.

सर्दी खोकला किंवा थोडसं जरी बरं वाटत नसेल तर अनेकांना चहा प्यायला आवडतं. सध्या कोरोनाच्या भीतीने घरातून बाहेर पडल्यानंतर लोक गरम पेय पिण्याला प्राधान्य देत आहेत. यातही चहाचे प्रमाण जास्त आहे. चहा रोज पिणं आरोग्याला चांगलं नाही असंही काहींचे म्हणणे आहे मात्र जर याच चहात काही पदार्थ टाकले तर तो चहा दररोज पिण्यासाठी आरोग्यदायी असेल. अशा चहामुळे प्रतिकारशक्तीही वाढते. 

तिळाचे आश्चर्यकारक फायदे, सुंदर आणि निरोगी शरीरासाठी आहे उपयुक्त

प्रतिकार शक्ती कधीच एका दिवसात वाढत नाही. त्यासाठी एखादी गोष्ट सातत्याने करावी लागते. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण चांगलं अन्न खाल्लं पाहिजे. यासाठी काही सोपे उपाय आहेत. दररोजच्या जीवनात या गोष्टींचा समावेश करायला हवा. त्याचा सकारात्मक असा परिणाम होऊन प्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होईल. 

'व्हिटॅमीन डी'च्या कमतरतेमुळे कोरोनाने घेतले सर्वाधिक मृत्यू, वाचा काय आहे उपाय

चहामध्ये आल्ले, मध किंवा गुळ घातल्यानं चहा स्पेशल होतो. आतापर्यंत चहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, फ्लेवर वापरले असतील पण हा आरोग्यदायी चहा एकदा करून बघाच.
सारखं सारखं तोंड येतयं ? काय आहेत कारणे ?

चहा तयार करताना एक चिमट जेष्ठमधाची पूड आणि लवंग टाका. या दोन्ही गोष्टी बाजारात सहज मिळतात. तसंही जवळपास प्रत्येक घरात या दोन्ही गोष्टी असतात. यांच्या वापराने प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते. ताप, खोकला, सर्दी किंवा फ्लू सारख्या लक्षणं दिसत असतील तर अशा परिस्थितीतही तुम्हाला कमी त्रास होतो. 
Lockdown मध्ये बिघडलं झोपेचं गणित? अशी सोडवा समस्या

जेष्ठमधात अँटी व्हायरल तत्वांचा समावेश असतो. यामुळे आजाराच्या प्रादुर्भाव होत नाही. यातील अँटी ऑक्सीडेंट्स प्रतिकार शक्ती कमी करणाऱ्या विषाणूंपासून शरीराचे रक्षण करतात. तसंच लवंगाचा वापर केल्यास शरीरातील व्हायरस इन्फेक्टेड सेल्स मारले जातात. तुम्हाला चहा कितीही आवडत असला तरीही तो प्रमाणाबाहेर घेणं अपायकारक आहे. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग्य आणि संतुलित आहार घेण्याची गरज आहे. एका दिवसात जास्ती जास्त 4 ते 6 कप चहा पुरेसा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: add liqourice and clove in tea will heplfull for immunity