esakal | हिंगोलीत नव्याने १४ जणांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रात्री प्राप्त अहवालानुसार आयसोलेशन वार्ड जिल्हा रुग्णालय हिंगोली अंतर्गत एका ६० वर्षीय पुरुष जो हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील रहिवासी आहे आणि सारीच्या आजाराने भरती होता. त्याला कोरोनाची  लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील रुग्णाला बाहेर गावावरुन येण्याचा पुर्व इतिहास नाही.

हिंगोलीत नव्याने १४ जणांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात बुधवार (ता. ८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार १४ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली. रात्री प्राप्त अहवालानुसार आयसोलेशन वार्ड जिल्हा रुग्णालय हिंगोली अंतर्गत एका ६० वर्षीय पुरुष जो हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील रहिवासी आहे आणि सारीच्या आजाराने भरती होता. त्याला कोरोनाची  लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील रुग्णाला बाहेर गावावरुन येण्याचा पुर्व इतिहास नाही.

आज रोजी क्वॉरनटाईन सेंटर आंधरवाडी हिंगोली अंतर्गत एका ३२ वर्षीय महिला आणि १ वर्षीय मुलाला राहणार तलाब कट्टा हिंगोली , त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे . हे दोन्ही रुग्ण तलाब कट्टा येथील कोविड -१ ९ महिला रुग्ण ज्या नांदेड ला भरती आहेत , त्यांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.

हनवतखेडा तालुका हिंगोली हा मुंबईमधुन परतला

औंढा नागनाथ तालुका अंतर्गत दौड गाव येथील २५ वर्षीय प्रसुती पश्चात महिला व एक ५० वर्षीय महिला यांना कोविड- १९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही महिला औरंगाबादमधुन गावाकडे परतल्या आहेत. आज रोजी क्वॉरनटाईन सेंटर लिंबाळा अंतर्गत सहा व्यक्तींना कोविड- १९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात १८ वर्षीय पुरुष राहणार हनवतखेडा तालुका हिंगोली हा मुंबईमधुन परतला आहे. 

हेही वाचा -  आश्‍चर्य: जप्त वाळूला पाय फुटले...कुठे ते वाचा?

भांडेगाव तालुका हिंगोली हा मुंबईमधुन परतला

२६ वर्षीय पुरुष राहणार भांडेगाव तालुका हिंगोली हा मुंबईमधुन परतला आहे. तसेच ३७ वर्षीय पुरुष  यासह १२ वर्ष, १६ वर्ष व महिला १४ वर्ष सर्व राहणार कळमकोंडा तालुका हिंगोली सर्वजन वाळुज औरंगाबादमधुन परतले आहेत. आज रोजी क्वॉरनटाईन सेंटर कळमनुरी अंतर्गत शेवाळा गावातील दोन महिन्याच्या मुलीला कोविड-१९ ची लागण झाली आहे. सदरील मुलीचे पालक हे ठाणेमधुन परतले आहेत. आज रोजी क्वॉरनटाईन सेंटर सेनगाव अंतर्गत वैतागवाडी गावातील ( प्रा. आ. केंद्र. कौठा ) ४५ वर्षीय पुरुष आणि १४ वर्षीय मुलाला कोविड- १९ ची लागण झाली आहे. दोन्ही रुग्ण मुंबईमधुन गावाकडे परतले आहेत.
 
आज घडीला एकूण ५१ रुग्णांवर उपचार चालु

प्राप्त अहवालानुसार एकुन १४ नव्याने कोविड- १९ रुग्ण आढळुन आले आहेत. आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे एकुण ३१४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २६३ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व आज घडीला एकुन ५१ रुग्णांवर उपचार चालु आहेत. 

जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे १०

आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे १० कोविड -१९ रुग्ण ( एक रिसाला बाजार , एक मकोडी, दोन बहिर्जीनगर, दोन गांधी चौक, एक जि.एम.सी.नांदेड, एक पेडगाव, दोन शुक्रवार पेठ )  डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमत मध्ये ९ कोविड -१९ रुग्ण ( एक वसमत शहर, दोन बहिर्जी नगर, एक गणेश नगर , एक दर्गापेठ , एक रिधोरा, दोन टाकळगाव , एक जय नगर ) येथील रहिवासी आहे तो उपचारासाठी भरती आहे.

कोरोना केअर सेंटर कळमनुरीत आठ रुग्न

कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे एकुन आठ कोविड- १९ रुग्ण ( एक बाभळी, दोनविकासनगर, तीन नवी चिखली, एक डिग्रस, एक शेवाळा ) येथील रहिवासी आहेत ते उपचारासाठी भरती आहेत. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असुन कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत १५ कोविड-१९ चे रुग्ण ( तीन तलाब कट्टा, दोन केंद्रा बु, एक प्रगतीनगर हिंगोली, तीन भांडेगाव , एक पिंपळखुटा, एक हनवतखेडा, चार कळमकोंडा ) उपचारासाठी भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असुन सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. 

येथे क्लिक करानांदेड परिमंडळातील वीजग्राहकांनी ‘एवढ्या’ कोटींचा केला भरणा

चार हजार ६२२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला 

कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे तीन कोविड- १९ चे रुग्ण ( एक केंद्रा बु, दोन वैतागवाडी ) उपचारासाठी भरती आहे. क्वॉरन्टाईन सेंटर औंढा नागनाथ येथे सहा कोविड- १९ रुग्ण ( दोन औंढा नागनाथ, दोन भोसी, दोन दौडगाव ) उपचारासाठी भरती आहेत. हिंगोली जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वार्ड , सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन पाच हजार ४३६ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी चार हजार ९०४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. चार हजार ६२२ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करून घ्यावी

सद्यस्थितीला ८०३ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २४९ अहवाल येणे व स्वॅब घेणे प्रलंबित आहे. हिंगोलीतील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाचे विकार, कॅसर इ. दुरधर आजार आहेत, यांनी आरोग्याची विषेश काळजी घ्यावी व काही त्रास झाल्यास तात्काळ जवळच्या उपकेंद्र ( सामुदाय आरोग्य अधिकारी मार्फत ), प्राथमीक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच अत्यंत इमरजन्सी असल्याशिवाय घरा बाहेर पडू नये व अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घरीच थांबुन मोलाचे सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. श्रीवास यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

loading image