अंबडमध्ये नष्ट केला 15 लाख रूपयांचा गुटखा; प्रशासनाची कारवाई

बाबासाहेब गोंटे
Friday, 25 December 2020

 अंबड पोलिस ठाण्यात सन 2019 ते 2020 मधील दहा गुन्ह्यामध्ये पकडलेला 15 लाख रुपयांचा गुटका नष्ट केला आहे.

अंबड(जि.जालना): अंबड पोलिस ठाण्यात सन 2019 ते 2020 मधील दहा गुन्ह्यामध्ये पकडलेला 15 लाख 8528 रुपयांचा गुटखा गुरुवारी (ता.24) दुपारी दोन ते चार या वेळेत पालिकेच्या घनकचरा प्रकल्प परिसरात नष्ट करण्यात आला आहे.

यामध्ये गोवा, हिरा, रत्ना पती, खिमाम, तेजो, सुगंधी, रॉयल 717, व्ही 1, व्हि 7, हिरा पान मसालासह आदी सुगंधी गुटख्याची जाळून होळी करण्यात आली. याप्रसंगी अन्न व औषध भेसळ अधिकारी एस.एन.चट्टे, पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, स्वच्छता निरीक्षक जी.जे.चौधरी, पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णु चव्हाण, महेंद्र गायके, एस.सी. पंचमीरे, गृहरक्षक दलाचे जवान, शहरातील प्रतिष्ठित पंच सह आदीच्या समक्ष गुटख्याची होळी करण्यात आली आहे.

धक्कादायक! कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस

अनिरुध्द नांदेडकर (पोलिस निरीक्षक) अंबड शहर व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. यामुळे निवडणूक काळात शांतता व सुरक्षितता पाळण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर यांनी जनतेला केले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 lakh rupees gutkha destroyed in Ambad Administration Action