दोन गृह राज्यमंत्री गायबच, चित्रा वाघ यांची टीका

हरी तुगावकर
गुरुवार, 12 जुलै 2018

लातूर : राज्यात मुली व महिलावर अत्याचाराच्या प्रमाणात तीस
टक्क्याने वाढ झाली आहे. महिलासाठीचे ३५ कायदे असून त्याची प्रभावीपणे
अंमलबजावणीच होताना दिसत नाही. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते आहे. या
खात्याला दोन राज्यमंत्रीही आहेत ते तर गायबच झाल्यासारखे आहेत. मुली व महिलांवर अत्याचार होत असताना हे सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसल्या सारखेच आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या
प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी (ता.१२) येथे पत्रकार परिषदेत
केली.

राज्यात विकृतांची मानसिकता वाढीस लागली आहे. आघाडीच्या काळात मुली व महिलांवर अत्याचार होत नव्हते असे म्हणणार नाही पण या भाजपच्या काळात मात्र ३० टक्क्यांनी अत्याचार वाढले आहेत. ही शासकीय आकडेवारी आहे. कायद्याचा धाक राहिलेला नाही. शिक्षेचे प्रमाण नगण्य आहे. ईमेलवर तक्रार केली तर एफआयआर दाखल करून असे मुख्यमंत्री देवेंद् फडणवीस सांगतात. पण एखादी बलात्कारीत महिला दहा ठिकाणे फिरते तरी तीचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. छे़डछाडीमुळे मुली आत्महत्या करत आहेत. अत्याचाराच्या बाबतीत बिहारच्या मागे आपले राज्य नाही, असेही श्रीमती वाघ म्हणाल्या.

सेल्फी विथ डॉटर काढले की मुली महिला सुरक्षीत आहेत, असे सरकारला वाटत आहे. महिलांची सुरक्षीतता केवळ जाहिरातीवरच आहे. अत्याचाराच्या संदर्भात कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली नाही तर सरकारला सिंहासनावरून महिला खाली खेचतील असा इशारा त्यांनी यावेळी दिला. महिलांच्या सुरक्षीतेतसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला सेफ्टी आॅडिट हे अभियान राबविण्यात येत आहे. यात गावपातळीवरील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने महिलात सुरक्षीततेची भावना, त्यांचा विकास, आरोग्य याविषयावर काम केले जाणार आहे, असे त्या म्हणाल्या. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहरा्ध्यक्ष मकरंद सावे, बबन भोसले, नगरसेवक राजा मणियार उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2 state minister is not there chitea wagh criticized