Coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात २९ हजार जणांना कोरोनाचा धोका?

corona1.jpg
corona1.jpg

उस्मानाबाद : कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे की नको अशा द्विधावस्थेत असलेल्या प्रशासनाने आता दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत तब्बल २९ हजार नागरिक विविध आजाराने ग्रासले असल्याने त्यांची वेगळी काळजी घेऊन कामकाज सुरूच ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रीत ठेवण्यासाठी लॉकडाऊन करा, अशी आग्रही मागणी एका वर्गातून होत आहे. तर दुसरीकडे आमच्या रोजगाराचे काय, असे म्हणत लॉकडाऊन करू नये, असे म्हणणारा दुसरा वर्ग आहे. या दोन्हीमध्ये प्रशासनाची मात्र चांगलीच अडचण होत आहे. कोणाताही निर्णय घेतला तरी अवघड असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यासाठी प्रशासनाने आता यातून मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोरोनाच्या संसर्गाला दुर्धर आजार असणारे नागरिक बळी पडत आहेत. त्यासाठी या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

२९ हजार दुर्धर आजाराने ग्रासलेत
जिल्ह्यातील अशा नागरिकांची यादी करण्याचे काम सुरू झाले आहे. अशा नागरिकांना वेगळे करून त्यांची खास काळजी घेतली जाणार आहे. शनिवारपर्यंत (ता. १२) झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक सहा हजार ११५ रुग्ण आहेत. त्यानंतर कळंब पाच हजार २२४, उमरगा चार हजार ८९२, उस्मानाबाद चार हजार १५३, परंडा तीन हजार ९५०, भूम दोन हजार ६११, वाशी एक हजार ५२३ तर लोहाऱ्यात एक हजार ३५२ रुग्ण असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहेत.

हायपरटेन्शनचे सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ८२० दुर्धर आजार असणाऱ्यांची नोदंणी झाली आहे. यामध्ये हायपरटेन्शनचे सर्वाधिक सात हजार ९०७ रुग्ण आहेत. तर मधुमेहाचे सहा हजार ७३२, मुधमेह आणि हायपरटेन्शन असणारे दोन हजार ६८०, हदयविकार असणारे दोन हजार ६०९, अस्थमा असणारे एक हजार ८८३ याशिवाय कर्करोग, एचआयव्ही असणाऱ्या रुग्णांची सख्याही मोठी आहे. त्यामुळे यापुढेही हायपरटेन्शनचे रुग्ण वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. किंबहुना अशा रुग्णांमुळेच कोरोनाचा संसर्ग होऊन बळी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यासाठी त्यांना  वेगळे ठेवणे. त्यांची वेगळीच काळजी घेणे. त्यांना कोरोनाच्या संसर्गापासून कसे वेगळे ठेवता येईल, यासाठी त्यांच्या घरातील व्यक्तींना मार्गदर्शन करणे. असे प्रयोग राबविले जाणार आहेत.
 दिपा मुधोळ-मुंढे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

संपादन : प्रताप अवचार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com