7 new covid 19 cases Umarga district Osmanabad
7 new covid 19 cases Umarga district Osmanabad

covid 19 : उमरग्याला पुन्हा धक्का, सात पॉझिटिव्ह

उमरगा, ता. (जि. उस्मानाबाद) : उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयातून बुधवारी (ता. एक) पाठविण्यात आलेल्या ५७ जणांच्या स्वॅब पैकी सात जणांच्या स्वॅबचा अहवाल गुरूवारी (ता. दोन) रात्री पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, सहा दिवसांत सतरा रूग्ण पॉझिटिव्ह आल्याने उमरगेकरांना धक्का बसला आहे. 

उमरगा शहरात २७ जूनला एक रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर त्यापाठोपाठ त्याचे दोन नातेवाईक पॉझिटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या तीन डॉक्टर्ससह दहा कर्मचाऱ्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पाच तर दुसऱ्या एका रुग्णालयातील एक असे सहा कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

तर राष्ट्रीयकृत बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या पतीसह कर्मचाऱ्यांचे स्वॅब पाठविण्यात आले होते, त्यात पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर इतर कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महिलेचा पतीही शहरातील दुसऱ्या  शाखेत वरिष्ठ पदावर आहे. दरम्यान गुरुवारी ५६ स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले असून शुक्रवारी (ता. तीन) रात्री नऊ वाजता अहवाल प्राप्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com