लातूर जिल्ह्यात मन्याड नदीपात्रात एक जण गेला वाहून

विळेगाव येथील एक इसम मन्याड नदीच्या पुरात वाहून गेल्याची झाल्याची घटना घडली आहे
लातूर जिल्ह्यात मन्याड नदीपात्रात एक जण गेला वाहून
sakal

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील विळेगाव येथील एक इसम मन्याड नदीच्या पुरात वाहून गेल्याची झाल्याची घटना घडली आहे.  तालुक्यातील मागील चार पाच दिवसापासून होत असलेल्या संततधार पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. विळेगाव येथील रंगकाम करून उपजीविका भागवणारे गंगाराम सोपान तरूडे ( 37 वर्ष) हे गावातील लोकांसोबत मंगळवारी ( ता.28 ) गावालगत असलेल्या मन्याड नदीपात्रात आलेले पाणी पाहण्यास  गेले होते.

लातूर जिल्ह्यात मन्याड नदीपात्रात एक जण गेला वाहून
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हवी शाळा

नदीच्या पाण्यात आपली चप्पल धुवावीत म्हणून पात्रातील पाण्यात एक पाय सोडला असता तोल जाऊन पात्रात पडून वाहून गेले. गंगाराम तरूडे यांना पोहता येत असताना सुद्धा पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने ते आपला बचाव करू शकले नाहीत. वाहून गेलेल्या इसमाचा शोध घेण्यासाठी अहमदपूर नगर पालिकेचे अग्नीशमन अधिकारी नागनाथ उप्परबंडे, अजित लाळे, प्रकाश जाधव, संभाजी भालेराव यांनी मंगळवारी दुपारी एक ते सहा पर्यंत प्रयत्न केले परंतु शोध लागला नाही. घटनास्थळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र केदार यांनी भेट दिली आहे. प्रशासनाने एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती कळवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com