मुलीच्या बारशाला जाताना गाडी खडीवरून घसरली; दुचाकीस्वाराचा मृत्यू

ही बाब रात्री पावणे दहाच्या सुमारास या रस्त्यावरून जाणारे ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या लक्षात आली.
Accident
Accidentsakal

जेवळी, (ता. लोहारा) : नातेवाईकाच्या मुलीच्या बारशाला जात असताना रस्ता दुरुस्तीसाठी टाकलेल्या खडी वरून मोटरसायकल घसरून पडल्याने मोटरसायकल स्वराचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. ही घटना रविवारी (ता.१६) रात्री आडे आठ वाजता जेवळी (ता. लोहारा) गावाजवळ घडली आहे. (Marathwada Accident News) 

या बाबत माहिती अशी की मदार इस्माईल शेख (वय ३५) रा. गुब्याळ (ता. औसा) हे रविवारी (ता.१६) रात्री साडे आठ सुमारास आपल्या नातेवाईकांच्या मुलीच्या बारशाला दक्षिण जेवळी येथे जात होते. जेवळी येथील भुकंपा पूर्वीच्या गावाजवळ येणेगुरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर रस्ता दुरुस्तीसाठी टाकलेल्या खडीचा अंदाज न आल्याने मोटरसायकल घसरून पडल्याने मोटरसायकल स्वार मंदार शेख हे गंभीर जखमी झाले.

Accident
बंद घरातून केली होती चोरी; 'त्या' तिघांना ४८ तासाच्या आत अटक

रात्रीची वेळ असल्याने त्यांना लवकर मदत मिळू शकली नाही. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. ही बाब रात्री पावणे दहाच्या सुमारास या रस्त्यावरून जाणारे ऊस वाहतूक ट्रॅक्टर ड्रायव्हरच्या लक्षात आली. त्यांनी जवळच्या धाब्यावर या घटनेची माहिती त्यांनी दिली. येथील नागरिकाने घटनास्थळी जाऊन पाहिले असता अपघातात मोटरसायकल स्वराचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. याबाबत लोहारा पोलिसांना माहिती देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com