तृतीयपंथीकडून ढोकी-लातूर मार्गावर दिवसाढवळ्या लूट, वाहनचालक भयभीत

जबरदस्तीच्या लुटीमुळे वाहनचालक भयभीत होत असून अपघाताचेही प्रमाण वाढले आहेत.
Crime News
Crime Newssakal media

कळंब (जि.उस्मानाबाद) : ढोकी-लातूर मार्गावर तालुक्यातील ढोराळा बस स्थानकाजवळील गतिरोधकवर वाहनाला आडवे जाऊन तृतीयपंथीकडून वाहनधारकाची लूट करण्यात येत असल्याचा प्रकार वाढला आहे. तृतीयपंथीला 'खुशी'न दिल्यास चालत्या वाहनांच्या अंगावर येणे, गाडीच्या दरवाज्यावर जोरात मारणे असे प्रकार वाढल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या जबरदस्तीच्या लुटीमुळे वाहनचालक भयभीत होत असून अपघाताचेही प्रमाण वाढले आहेत. ढोकी-लातूर (Latur) मार्ग हा एकपदरी रस्ता असून वाहने सुसाट धावत आहेत. जोरात धावणाऱ्या वाहनाची गती कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियमबाह्य व न्यायालयाचा आदेश झुगारून ढोराळा गावाजवळ मोठे-मोठे तीन पट्टीचे लागत मोठ्याजाडीचे गतिरोधक बसविण्यात आले आहेत.(Transgender Forcefully Collect Money From Drivers At Dhoki Latur Road In Kalamb Of Osmanabad)

Crime News
'सोनिया मातोश्रींचे पाय धुता, त्यामुळे राज्याचे प्रश्न कुठे सुटलेत'

त्यामुळे कळंब (Kalamb), ढोकीहुन लातूरकडे व लातूरहून ढोकीकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची गतिरोधकवर झिरो स्पीड होते. वाहतुकीस रस्ता अरुंद असल्याने गतिरोधक पाहावे की, समोरून येणारी वाहने यामुळे वाहनचालकामध्ये एकच गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. या गतिरोधकवर वाहनांची स्पीड कमी होताच चार पाच तृतीयपंथींकडून वाहनाला वेढा टाकला जातो तर यातील काही तृतीयपंथी (Transgender) वाहनसमोर आडवे उभे राहून १०-२० रुपये जबरदस्तीने उखळत आहेत. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असूनही पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहेत. ट्रक चालकाकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम घेतली जात असल्याची माहिती समोर येत असून जबरदस्तीच्या लुटीला वाहनचालक वैलागले आहेत. पैसे न दिल्यास तृतीयपंथीकडून वाहनचालकसोबत हुज्जत घालून गोंधळ घालण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. (Osmanabad News)

Crime News
PM मोदींच्या घोषणेने नेपाळचा संताप, काम बंद करण्यास सांगितले

जबरदस्तीने होणारी लूट थांबवा

ढोकी-लातूर मार्गावर दुचाकी, चारचाकी, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत आहे. तालुक्यातील ढोराळा गावाजवळ लागत तीन गतिरोधक असून वाहनांची स्पीड कमी झाल्यानंतर तृतीयपंथीकडून वाहनाच्या दरवाजा उघडला जातो. पैसे न दिल्यास वाहनावर जोरात मारले जाते. यातील काही जणांकडून वाहने चक्क अडवून जबरदस्तीने लूट करण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गवरील लुटीचा प्रकार थांबवावा अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.

आलिशान वाहनांना लक्ष

या मार्गावरून आलिशान वाहनाची मोठी वाहतूक होत असून दुरवरून गतिरोधक दिसून येत नाही. आलिशान वाहन गतिरोधकवर ब्रेक होताच तृतीयपंथीकडून जवळ येऊन जास्तीच्या पैशाची मागणी करून हुज्जत घातली जाते. तीनआसनी रिक्षे, काळी-पिवळी प्रवासी वाहतूक करणारी वाहनांना न अडवता आलिशान वाहने लक्ष केली जात आहेत. असे या मार्गावरून प्रवास करणारे सुधीर कोठावळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com