esakal | दुहेरी खूनप्रकरणातील आरोपीस कोठडी

बोलून बातमी शोधा

file photo

शहराच्या देगलुर नाका परिसरात असलेल्या मुजाहीद चौक भागात दोन गटात जुन्या वादातून किरकोळ भांडणानंतर चक्क तलवार आणि गोळीबार करण्यात आला. यात तिघेजण गंभीर जखमी झाले होते.

दुहेरी खूनप्रकरणातील आरोपीस कोठडी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दुहेरी खूनप्रकरणातील फरार असलेल्या तिसऱ्या आरोपीस धर्माबाद परिसरातून अटक केली. त्याला शनिवारी (ता. २५) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश एस. एस. गवई यांनी ता. २९ एप्रीलपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

शहराच्या देगलुर नाका परिसरात असलेल्या मुजाहीद चौक भागात दोन गटात जुन्या वादातून किरकोळ भांडणानंतर चक्क तलवार आणि गोळीबार करण्यात आला. यात तिघेजण गंभीर जखमी झाले होते. घटनास्थळीच मोहमद जुनेद याचा मृत्यू झाला होता. तर उपचारादरम्यान जखमी झालेला शेक शिराज शेख मौला याचा मृत्यू झाला. जखमीपैकी अजूनही एकजण उपचार घेत आहे. ता. २५ मार्च रोजी हा हल्ला झाला होता. लॉकडाऊन असल्याने जखमीना उपचारासाठी धावाधाव करावी लागली.

हेही वाचा - गोवंश हत्या बंदी कायद्याची ऐशी की तैशी

गोळीबार प्रकरणानंतर होता फरार

याप्रकरणी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात मोहमद अली याच्या फिर्यादीवरुन सात जणांवर खूनासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर नांदेड ग्रामिण पोलिसांनी मोहम्मद मोहियोद्दीन उर्फ हफिजोद्दीन फारुखी इनामदार याला अटक केली होती. त्यानंतर दुसरा आरोपीही  पोलिसांच्या तावडीत सापडला. यानंतर काही आरोपी फरार झाले. फरार आरोपींच्या मागावर पोलिस लक्ष ठेवून होते. यातील गोळीबार केलेला आरोपी हा धर्माबाद येथे लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
 
खासगी शिक्षक असलेला मोहम्मद युनुस मोहम्मद मोहियोद्दीनला कोठडी

त्यांनी सापळा लावून खासगी शिक्षक असलेला मोहम्मद युनुस मोहम्मद मोहियोद्दीन (वय ३०) याला शुक्रवारी (ता. २४) अटक केली. मोहम्मद युनुस हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर मुदखेड व तेलंगनामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला यापूर्वी अमली पदार्थ विक्री प्रकरणी वरंगल (तेलंगना) पोलिसांनीही अटक केली होती. पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी मोहम्मद युनूस याला न्यायालयात हजर केले. न्यायाधिश एस. एस. गवई यांनी त्याला ता. २९ एप्रीलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

२० हजाराची शिंदी दारु जप्त

नांदेड : शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाने गस्त दरम्यान २० हजाराची शिंदी जप्त केली. ही कारवाई खोब्रागडेनगर परिसरात शनिवारी (ता. २६) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

हे देखील वाचायलाच पाहिजे - कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड

जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. परंतु याचा फायदा काही मंडळी घेत असून अवैध धंद्याला पाठबळ देत आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रवी वाहूळे हे आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री आपल्या ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. लॉकडाउनचा बंदोबस्त असतानाही माहिती मिळताच श्री. वाहूळे यांनी खोब्रागडेनगर भागात जावून कारवाई केली.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

यावेळी त्यांनी एकाला अटक करून त्याच्याकडून २० हजाराची शिंदी दारु जप्त केली. जप्त केलेली शिंदी ही बाजूलाच पंचनामानंतर नष्ट करण्यात आली. या प्रकरणी पोलिस हवालदार संजय मुंडे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. गोटमवाड करत आहेत.