कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड

उमेश वाघमारे 
Sunday, 26 April 2020

जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणेची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. आरोग्याचा शत्रू कोरोनाप्रमाणे समाजाचे शत्रू असलेल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर दिवसरात्र कष्ट घेत आहेत.

जालना - कोरोना रोखण्यासह कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हेही कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी सरसावलेले आहेत. अर्थात, सध्याच्या प्रचंड व्यस्ततेतही जनतेप्रमाणेच कुटुंबाच्याही आरोग्यरक्षणाबाबत ते सजग आहेत.

हेही वाचा : त्यांच्या’साठी आता जिल्हाच बनलंय कुटुंब...

जालना जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह पोलिस यंत्रणेची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. आरोग्याचा शत्रू कोरोनाप्रमाणे समाजाचे शत्रू असलेल्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर दिवसरात्र कष्ट घेत आहेत. हे करताना सध्या कुटुंबीयांनाही वेळ देणे शक्य नाही.

हेही वाचा : आता सारेकाही जनतेच्या आरोग्याच्या रक्षणासाठी.... 

घरी ७५ वर्षीय वडील प्रभुसिंह गौर, घरातील सदस्य यांच्याशी सध्याच्या धावपळीत संवादही कमी झालेला. दिवसभर ठिकठिकाणी भेटी, कारवाई केल्यानंतर कर्तव्यावरून घरी गेल्यावर कपडे, जवळील वस्तू आधी सॅनिटराईज्ड कराव्या लागतात. अंघोळ केल्यानंतर मग कुठे घरात वावर. सेवानिवृत्त तहसीलदार असलेले वडील प्रभुसिंह यांच्यासोबत सुरक्षित अंतर ठेवून मग बोलणे. कुटुंबासोबतही ते पूर्वीप्रमाणे मिसळत नाहीत. विशिष्ट अंतर ठेवून परस्परांशी चर्चा होते. सध्याच्या स्थितीत तेही अनेकदा शक्य होत नाही.

हेही वाचा : दीड वर्षाच्या चिमुकलीला घरी ठेवत ‘त्या’ कर्तव्यावर

राजेंद्रसिंह गौर यांना जशी आपल्या कुटुंबाची काळजी असते, तशीच सर्व कुटुंबीय त्यांची काळजी करीत असते. अर्थात, कोरोना रोखण्यासह समाजकंटकांचा समाचार घेणाऱ्या राजेंद्रसिंह गौर यांच्याबाबत सहकाऱ्यांप्रमाणेच कुटुंबीयांनाही अभिमान आहेच. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police officers efforts for public protection