देगलूर - ता. ३ जानेवारी २०२५ रोजी परभणी ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत पारवा शिवारातील आखाड्यावर दरोडा टाकून तेथील एका मजुरी करणाऱ्या महिलेवर अत्याचार करून फरार होणाऱ्या कुख्यात आरोपीस देगलूर पोलिसांनी ता. ६ मे रोजी सकाळी ११ वाजता खानापूरफाटा, ता. देगलूर येथे मोठ्या शिताफिने अटक केली.