esakal | खासगी दवाखाने बंद ठेवल्यास होणार कारवाई 

बोलून बातमी शोधा

korona

 कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर शासकीय दवाखाने २४ तास सुरू असून खासगी दवाखानेही सुरू ठेवावेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा शुक्रवारी (ता.२७) घेण्यात आलेल्या डॉक्‍टरांच्या बैठकीत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिला आहे. 

खासगी दवाखाने बंद ठेवल्यास होणार कारवाई 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा नागनाथ तालुका डोंगराळ भागात आहे. सध्या कोरोना साथ पसरत असून अशा स्थितीत खासगी दवाखाने बंद ठेवली जात आहेत. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर शासकीय दवाखाने २४ तास सुरू असून खासगी दवाखानेही सुरू ठेवावेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा शुक्रवारी (ता.२७) घेण्यात आलेल्या डॉक्‍टरांच्या बैठकीत तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी दिला आहे. 

या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, डॉक्टर असोसीएशनचे अध्यक्ष डॉ. विलास खरात, डॉ.  दत्ता सावळे, डॉ. अभय देशपांडे, डॉ. देविदास आडे, डॉ. रिसोडकर, डॉ. सत्यनारायण अग्रवाल, डॉ. विमल बोरा, डॉ. हरीश ऋषी, डॉ. प्रविण सोनी, डॉ. मुकेश पवार, डॉ. बोंडा, डॉ. गंगावणे, डॉ. मारुती धर्माधिकारी, डॉ. पांडुरंग राठोड, डॉ. पुरुषोत्तम देव, डॉ. काझी यांच्यासह श्री. तुडमे, सर्जेराव पंडित, अब्दुल कदीर, महावीर सराफ यांची उपस्‍थिती होती.

हेही वाचा वाहतूक पोलिस कर्मचारी देणार ८१ दिवसांचे वेतन

दवाखाने बंद करू नयेत

 या बैठकीत प्रत्‍येकात एक मीटरचे अंतर ठेवण्यात आले होते. या वेळी तहसीलदार श्री. माचेवाड यांनी सूचना दिल्या. खासगी दवाखाने दिवसभर सुरु ठेवावेत, फॅमिली डॉक्टरांनी शक्यतो पेशंटला फोनवरूनच औषधी, गोळ्या सांगाव्यात, ते मेडिकल वरून घेतील. परंतु, दवाखाने बंद करू नयेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दवाखान्यामध्ये रुग्ण आल्याच्यानंतर त्यांना व्यवस्थित उपचार करा, त्यांना चांगल्या पद्धतीने बोला, चांगली वागणूक द्या, असे त्‍यांनी सांगितले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनीही उपस्‍थितांना मार्गदर्शन केले. 


घरपोच किराणा, मेडीकल मिळणार 

हिंगोली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. बाजारात जीवनावश्यक वस्‍तुंच्या दुकानावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी काही किराणा व औषधी विक्रेते घरपोच सेवा देणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली. शहरात संचारबंदी सुरू असून दिवसाआड भाजीपाल्याची विक्री सुरू आहे. तसेच सकाळी दहा ते दुपारी एक या वेळात आस्‍थापना सुरू आहेत. दुकानावर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांत एक मीटरचे अंतर ठेवले जात आहे. मात्र गर्दीत वाढ होत आहे. 

घरपोच सेवा पुरविणार

यासाठी शहरातील काही किराणा व औषधी विक्रेते घरपोच सेवा पुरविणार आहेत. अशा विक्रेत्यांची नगरपरिषदेकडे यादी आली आहे. यात गणराज शॉपी, लोटस सुपर शॉप, परिवार मॉल, रफिक आणि कंपनी, रामभाऊ बासटवार, यादव किराणा, रहिम किराणा, रेणुका प्रोव्हीजन, विक्रम स्‍टोअर्स, दुर्गा स्‍टोअर्स, अमीतेश स्‍टोअर्स, कादर किराणा, वैष्णवी किराणा, कैलास ट्रेडिंग, अंजली किराणा, दीपक किराणा, महाकाली किराणा, स्‍वामी समर्थ किराणा, जय श्रीराम किराणा, ममादेवी प्रोव्हीजन, पठाण किराणा, दुर्गेश्वरी किराणा, गोविंद किराणा, महावीर किराणा, कौतुकी प्रोव्हिजन, राजकुमार ट्रेडर्स, सती एजन्सी यांचा समावेश आहे.

येथे क्लिक कराहिंगोलीत आढळला कोरोना संशयित डॉक्टर

औषधी दुकानांचा समावेश

तर मेडीकल(औषधी) मध्ये साईकृपा मेडीकल, गजानन मेडीकल, तुलसी मेडीकल, प्रमोद मेडीकल, माऊली मेडीकल, कृष्णा मेडीकल, टेहरे मेडीकल, मुदीराज मेडीकल, साहू मेडीकल, आखरे मेडीकल, बगडीया मेडीकल, ज्‍योती मेडीकल यांचा समावेश आहे. या ठिकाणी संपर्क करून लागणारे सामान घरपोच मिळणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.