esakal | एक किलो साखरेचा कडवट किस्सा ! ४१ हजार कार्डधारकांना दिवाळीनंतर मिळतेय साखर
sakal

बोलून बातमी शोधा

Sugar

कोरोना संसर्गामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात केंद्र व राज्य सरकारने गरीब कुटुंबाना मोफत गहू व तांदळाचे वाटप करुन दिलासा दिला होता. मात्र दिवाळी सणासाठी अंत्योदय योजनेसह अन्नसुरक्षा व शेतकरी कार्डधारकांना कमी दराने प्रत्येकी एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला.

एक किलो साखरेचा कडवट किस्सा ! ४१ हजार कार्डधारकांना दिवाळीनंतर मिळतेय साखर

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : कोरोना संसर्गामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात केंद्र व राज्य सरकारने गरीब कुटुंबाना मोफत गहू व तांदळाचे वाटप करुन दिलासा दिला होता. मात्र दिवाळी सणासाठी अंत्योदय योजनेसह अन्नसुरक्षा व शेतकरी कार्डधारकांना कमी दराने प्रत्येकी एक किलो साखर देण्याचा निर्णय घेतला. पण सरकारी यंत्रणेच्या योग्य नियोजनाअभावी ४१ हजार कार्डधारकांना वेळेत साखर मिळू शकली नाही. दरम्यान साखरेचे वाटप दोन दिवसांत पूर्ण होईल, असे पुरवठा विभागाने सांगितले.

बीड जिल्हा हादरला: क्रूर प्रियकराने प्रेयसीवर ॲसिड, पेट्रोल टाकून जाळले; पहाटेपासून ते दुपारपर्यंत तरुणी तडफडत राहिली

दारिद्ररेषेखालील कुटुंबांना मिळणारी साखर बंद करण्यात आली आहे, तर अंत्योदय योजनेतील लाभार्थी कुटुंबाना केवळ एक किलो साखर वाटप करण्यात येते. यंदाच्या दिवाळीला कोरोनाची पार्श्वभूमी असल्याने लोकांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. सामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या घरी दिवाळी सणासाठी येणाऱ्या खर्चाचे नियोजन पंधरा दिवसापूर्वी करावे लागते. नवीन कपडे, फराळाचे गोडधोड साहित्य तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जेमतेमच घेण्यात आले. 

एक किलो साखरेसाठी धावाधाव !
स्वस्तधान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यासोबत दिवाळीपूर्वीच साखरचे वाटप होणे गरजेचे होते. परंतू शासनाचा निर्णय उशीरा झाला. प्रशासनाने नियोजन केले. पण शासकीय गोदामामध्ये साखर उशीरा पोचली. दारिद्ररेषेखालील (अन्नसुरक्षा), अंत्योदय व शेतकरी या तीन योजनेतून धान्याचे वाटप केले जाते. अंत्योदय योजनेच्या सात हजार शिधापत्रिकाधारकांना एक किलो साखरेचे नियमित वाटप केले जाते. यंदा दिवाळीसाठी अन्नसुरक्षा आणि शेतकरी कार्डधारकांना प्रति वीस रुपये किलो दराने एक किलो साखर वाटप करण्याचा निर्णय झाला. परंतू उमरग्याच्या गोदामामध्ये १३ तर मुरूमच्या गोडाऊनला १४ तारखेला साखर आली.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : अवांतर शुल्क पाहून विद्यार्थी आवाक; हॉस्टेल, मेस केली सक्तीची

तहसीलच्या पुरवठा विभागाने ऐन दिवाळीत साखर वाटपाचा गोंधळ उडण्याची शक्यता गृहीत धरून १३ तारखे दिवशीच दुकानदारांना परमीट दिले. जवळपास ऐंशी टक्के दुकानदारांनी संबंधित बँकेत चलनाद्वारे रक्कम भरली. दोन्ही गोदामाला परमीट पोचले आहेत. मात्र सणामुळे गोडाऊनला हमाल नसल्याने रविवारी (ता.१५) दुकानदारांनी साखर उचलली नाही. सोमवारी (ता.१६) पाडव्याचा सण असल्याने किती दुकानदार साखर उचलतील आणि त्याचे वाटप होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. दरम्यान एक किलो साखर कार्डधारका पर्यंत पोचविण्यासाठी दुकानदाराची धावपळ होत असून कार्डधारकांनाही दिवाळीपूर्वी साखर मिळाली नसल्याने शासनाचा मूळ हेतू दुर राहिला आहे.

संपादन - गणेश पिटेकर