esakal | हिंगोलीत एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मेघगर्जनेसह पाऊस | Hingoli Rain
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली - अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले व पाऊस देखील सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. अनेकांनी पानकापड, ताडपत्री घेत सोयाबीनच्या सुड्या झाकून ठेवण्याची लगबग सुरू केली होती.

हिंगोलीत एक दिवसाच्या विश्रांतीनंतर मेघगर्जनेसह पाऊस

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोलीत (Hingoli) एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी (ता.चार) दुपारी बारा ते दीड यावेळी मेघगर्जनेसह पाऊस झाला. ढगाळ वातावरण व पावसाची रिमझिम उशीरापर्यंत सुरुच होती. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अखेरच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतली. परत एक दिवस पाऊस झाला परत एक दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी दुपारी बारा ते दिड वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस (Rain) झाला. नंतर ढगाळ वातावरण व पावसाची रिमझिम तसेच मेघगर्जना देखील सुरू होती. एक दिवसाच्या विश्रांतीमुळे ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे. त्यांनी सोयाबीन (Soybean) काढणीची तयारी सुरू केली होती. मात्र आज अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले व पाऊस देखील सुरू झाला. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. अनेकांनी पानकापड, ताडपत्री घेत सोयाबीनच्या सुड्या झाकून ठेवण्याची लगबग सुरू केली होती.

हेही वाचा: संताप अन् संतापच ! चिखलातून काढावी लागली मुलीची अंत्ययात्रा

हा पाऊस हिंगोली शहरासह तालुक्यातील डिग्रस, नर्सी, काळकोंडी, सवड, घोटा, कोथळज, खांबाळा, फाळेगाव, पांगरी, भांडेगाव, साटंबा, मोप, आडगाव, पिंपरखेड, कारवाडी आदी ठिकाणी झाला आहे. मात्र कळमनुरी, वसमत, औंढा, सेनगाव येथे केवळ ढगाळ वातावरण होते. सतत होत असलेल्या पावसाने शेतकरी कंटाळून गेले आहेत. पावसामुळे शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. यापूर्वी झालेल्या पावसाने पिकात साचलेले पाणी तसेच असताना परत सुरू झालेल्या पावसाने पिकाची पुरी वाट लागल्याचे शेतकरी उत्तम पवार, गजानन पवार, उत्तम पांगरीकर यांनी सांगितले.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानला मोठा दिलासा

loading image
go to top