
तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता लवकरच पाटील हॉस्पीटल हे समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र ( डी. सी. एच. सी ) होणार आहे.
अहमदपूर (लातूर) : तालुक्यातील कोरोना संसर्ग वाढती रूग्ण संख्या लक्षात घेता लवकरच पाटील हॉस्पीटल हे समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र ( डी. सी. एच. सी ) होणार आहे.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांसाठी तालूक्यातील मरशिवणी येथे कोविड पुर्ण लक्ष केंद्र ( सी. सी. सी. ) असून या ठिकाणी कोविड आजराची लक्षणे नसलेला परंतु कोविड निदान झालेल्या सौम्य स्वरूपाच्या दिडशे रुग्णांच्या उपचाराची सोय आहे.
बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका
मागील आठवड्यापासून तालुक्यात दररोज पाच पेक्षा अधिक रूग्ण वाढत असून आजपर्यंत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण संख्या १२१ तर मृतांची संख्या सहा झाली आहे. तालुक्यातील वाढत्या संसर्गाने घाबरलेल्या नागरिकांना या नविन समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्राने दिलासा मिळणार आहे.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
शहरातील ग्रामीण रूग्णालयात पाच वर्षापासून एक ऑक्सीजन पुरवठा करणारे साधन (व्हेंटीलेटर) असून तीन महिन्यांपूर्वी येथील एका खासगी रूग्णालयात कोविड सेंटर निर्माण होत असल्याने व्हेंटीलेटरची मागणी केली होती. परंतु ते सेंटर रद्द झाल्याने व्हेंटीलेटर आले नाही. शहरात नविन समर्पित कोविड स्वास्थ्य केंद्र होणार असल्याने लवकरच नवीन व्हेंटीलेटर येणार आहे.
डॉ. सुरजमल सिंहाते, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय अहमदपूर.
(संपादन-प्रताप अवचार)