मी भाजप कार्यकर्ता, मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा : अजिंक्य टेकाळे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

उस्मानाबाद : 'मी भाजपचा कार्यकर्ता, मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा,' असे म्हणणारा ओम राजे निंबाळकरांवर हल्ला करणाऱ्या अजिंक्य टेकाळेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

खासदार ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा अटकेत

रात्रीच्या अंधारात शुट केलेल्या व्हिडीओत अजिंक्य म्हणतो, "मी 18 व्या वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. ओमराजे निंबाळकरांनी महायुतीत बंडखोरी केल्याचे पाहून मी हे पाऊल उचलेले.  

ओमराजे निंबाळकर यांनी  कारखाना बंद पाडला, हजारो तरुणांना बेरोजगार केले. हजारो घर बेघर केली. त्यामुळे  मी हे पाऊल उचलले. . आमच्या भाजप पक्षाला कळंब तालुक्यात कमी समजतात म्हणून मी हे पाऊल उचलले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला न्याय द्यावा, ही विनंती, "

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajinkya Tekale who attacked on Omraje Nimbalkar says he is BJP party Worker