राष्ट्रप्रेम आम्ही का सिद्ध करावे? - कवयित्री नीरजा

सुशांत सांगवे
शनिवार, 11 जानेवारी 2020

संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद : विरोधात एक शब्द जरी कोणी बोलले तर त्याला देशद्रोही ठरवले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. प्रत्येकाला राष्ट्रप्रेम सिद्ध करावे लागत आहे. अशा काळात लेखकाने दटुन उभे राहिले पाहिजे. एकत्र राहील पाहिजे. लेखक बोलत आलेला आहे, बोलत राहणार, असे स्पष्ट मत प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

संत गोरोबा काका साहित्य नगरी, उस्मानाबाद : विरोधात एक शब्द जरी कोणी बोलले तर त्याला देशद्रोही ठरवले जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. प्रत्येकाला राष्ट्रप्रेम सिद्ध करावे लागत आहे. अशा काळात लेखकाने दटुन उभे राहिले पाहिजे. एकत्र राहील पाहिजे. लेखक बोलत आलेला आहे, बोलत राहणार, असे स्पष्ट मत प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नीरजा सहभागी झाल्या आहेत. पुस्तकातून भेटणाऱ्या कवयित्री प्रत्यक्षात दिसल्याने अनेक शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यासोबत सेल्फीही घेतले. त्याही मुलांमध्ये रमल्या. काय-काय वाचता, असा प्रश्नही त्यांनी मुलांना विचारला. त्यामुळे गप्पांची अनौपचारिक मैफल रंगत गेली. त्यांच्या या संवादानंतर त्यांनी 'सकाळ'शी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, आणीबाणीच्या विरोधात लेखक बोलले आहेत. गप्प राहिले नाहीत. मागच्या सरकारच्या विरोधात बोलले. कारण आपण लोकशाही देशात रोहतो. विरोध करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण आताच्या काळात कोणाला विरोधात बोलले तर देशद्रोही ठरवले जात आहे. राष्ट्रप्रेम सिद्ध करा, म्हटले जात आहे. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. लोकांचा, त्यांच्या जगण्याचा विचार आम्ही करीत आहोत. मग तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही राष्ट्रप्रेम का सिद्ध करावे?

साहित्य संमेलनात वादग्रस्त पुस्तकाची विक्री, प्रकाशक-पोलिसांमध्ये वाद

आजवरच्या सगळ्या क्रांत्या लेखकाच्या शब्दाने झाल्या आहेत. मग ती फ्रेंच राज्यक्रांती असो किंवा रशियन राज्य क्रांती. त्यामुळे लेखकाने बोलत राहिले पाहिजे. प्रत्येक जण भाषणातूनच व्यक्त होईल, असे नाही. प्रत्येक लेखकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. त्यामुळे तो आपल्या साहित्यातून आपली भूमिका मांडतच असतो. विधाने करत असतो. समाजात आज अराजकतेचे वातावरण आहे. सामाजिक, राजकीय परिस्थिती पाहिली तर आपण इतक्या वर्षाने कुठे आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तो प्रत्येकाने करावा, असेही नीरजा यांनी सांगितले.

प्रत्येक तालुक्यात पुस्तक विक्री केंद्र सुरू करा, विक्रेत्यांची मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Osmanabad News, Neeraja Poetess News